सोनाली, अभिजीत आणि हेमंत सांगणार सोशल गमती-जमती 

sonali hemant abhijit
sonali hemant abhijit

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी सेलिब्रेटी सोशल साइटवर अॅक्टिव असलेले आपल्याला दिसतायत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो 'दोघी', 'दिल चाहता है' अशा सिनेमातून झळकलेली सोनाली कुलकर्णी  त्याशिवाय, 'बघतोस काय मुजरा कर' फेम हेमंत ढोमे आणि सध्या टिव्हीवर दिसणार्या 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतला गॅरी अर्थात अभिजीत खांडकेकर यांचा. खूप सारे फॅन्स असूनही अत्यंत समंजसपणे ही मंडळी सोशल मिडीया हाताळतायत. हे तिघे आता सोशल मिडीयाच्या 'गमतीजमती'वर बोलणार आहेत. निमित्त आहे, सोशल मिडीयावर कोणतेही स्पाॅन्सर्ड प्रमोशन न करता 'आमचं वेगळं आहे' अर्थात 'रावा आॅफिशिअल'च्या पाचव्या वर्धापन दिनाचं. या आगळ्या संवादाचं पहिल्यांदाच फेसबुकवरून लाइव्ह प्रक्षेपण होणार आहे. 'इ सकाळ'च्या फेसबुक पेजवरून ही धमाल अनुभवता येईल.  

RAVA - Official चा पाचवा वर्धापनदिन काशिनाथ घाणेकर ठाणे येथे साजरा होत आहे ११ जून २०१७ रोजी सकाळी १० वाजल्यापासून. या प्रसंगी ई सकाळ FB लाईव्ह करणार आहेत. दुपारी १ वाजता सकाळच्या sakalnews या एफबी पेजवरून हे लाइव्ह प्रक्षेपण होईल. . 

काय आहे 'रावा'?

पाच वर्षांपूर्वी एका इंजिनिअरने एक ग्रुप सुरू केला. त्या ग्रुपचं नाव ठेवलं ‘आमचं वेगळं आहे.. (एका लग्नाची दुसरी गोष्ट)’. झी मराठीवर त्यावेळी तुफान गाजत असलेल्या स्वप्नील जोशी आणि मुक्त बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेच्या चाहत्यांचा समूह असं या ग्रुपचं सुरुवातीचं स्वरूप होतं. बघता बघता लोक जॉइन होऊ लागले. मग गेटटुगेदर मोठ्या प्रमाणावर व्हायला हवं, अशी एक कल्पना आली. पहिल्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पहिलं गेट टुगेदर डोंबिवलीत झालं. मुक्ता बर्वे यावेळी उपस्थित होत्या. मग फेसबुक ग्रुप असलेला RAVA एक कुटुंब झालं. पुढे ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिका संपली. पण हे कुटुंब असंच पुढे न्यायचं असं ठरलं. सीमोल्लंघन करून मराठी चित्रपट, नाटक, मालिका आणि इतर कलाक्षेत्राच्या प्रगतीला आपला हातभार लावायचं निश्चित केलं गेलं. मग नवीन फेसबुक पेज सुरू केलं गेलं, वेबसाइटचा कायापालट झाला. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट, ब्लॉग, इत्यादी संपर्काची शक्य तितकी माध्यमं खुली केली गेली. जबाबदाऱ्या वाटून दिल्या गेल्या. RAVA Box Cricket League, RAVA Awards, निबंध स्पर्धा, त्याचबरोबर समाजकार्य अशा कितीतरी नवनव्या कल्पना यशस्वीपणे आजही राबवल्या जातात. RAVA पुन्हा नव्याने उभा राहू लागला. आणि RAVA एक NGO म्हणून रजिस्टर करण्यात आली. RAVA आता ‘RAVA Official’ झाला. आज सरकारदरबारी RAVAची नोंद आहे. आज रावाचे फेसबुकवर 23 हजारवर Followers आहेत. तर Twitterवरही 9 हजारपेक्षा जास्त तर instagram वर 30 हजारपेक्षा जास्त फाॅलोअर्स आहेत.  आता RAVA - Official चा पाचवा वर्धापनदिन ठाण्यात काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे साजरा होत आहे ११ जून २०१७ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ही धमाल रसिकांना अनुभवता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com