ईशाचा आज्जीबाईचा बटवा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

आपल्याला साधी सर्दी झाली, ताप आला की आपण लगेच डॉक्‍टरांकडे जातो. त्यांनी दिलेल्या गोळ्यांचा भडिमार आपल्या शरीरावर करतो. पण "जन्नत-2'फेम ईशा गुप्ता मात्र डॉक्‍टरांकडे अजिबातच जात नाही.

तिचा तिच्या आजीबाईच्या बटव्यावर खूपच विश्‍वास आहे. ती लहानपणापासूनच तिच्या आजी आणि आईचे घरगुती उपाय करते आणि ती इतरांनाही तसंच करण्याचा सल्ला देते. सर्दी, खोकला वा पोटाचा आजार असो. तिच्याकडे सगळ्यांवर रामबाण उपाय असतो. ती म्हणते अगदी शेवटाचा पर्याय म्हणून डॉक्‍टरांकडे जावं, असं मला वाटतं. लहानपणापासून तिच्या आई-वडिलांनीही घरगुतीच उपाय केले असल्याने तिलाही त्याची सवय लागली आणि आपोआप ज्ञान मिळत गेलं.

तिच्या घरातच निसर्गोपचार आणि योग यांचं पालन केलं जातं. मध्यंतरी तिचा मॅनेजर अचानक आजारी पडला. ईशा लगेच घरच्या वैद्याकडे गेली व तिनं काही घरगुती औषधी त्याला दिली आणि तो लगेचच बरा झाला.

ईशा म्हणते, "माझ्या बाबांना नेहमीच नॅचरोपॅथी आणि होमिओपॅथीवर विश्‍वास होता म्हणून मीही त्याच गोष्टीना फॉलो करते. मी अगदीच गरज भासली, तर गोळ्या-औषधं घेते. कारण- मला विश्‍वास आहे की निसर्ग माझी काळजी घ्यायला समर्थ आहे.' 

Web Title: Esha gupta home remedies