Bigg Boss 16: प्रियंका जरी ट्रॉफी हरली तरी सलमान खान म्हणाला.. माझ्यासाठी तीच जिंकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan , priyanka chaher chaudhary, bigg boss 16

Bigg Boss 16: प्रियंका जरी ट्रॉफी हरली तरी सलमान खान म्हणाला.. माझ्यासाठी तीच जिंकली

Bigg Boss 16 Priyanka Chaudhary: बिग बॉस १६ चा ग्रँड फिनाले शानदार पद्धतीने रंगला.. शो च्या ग्रॅंड फिनालेत टॉप 5 मध्ये प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे,एम सी स्टॅन,अर्चना गौतम आणि शालिन भनोत होते.

अखेर फॅन्सच्या प्रेमामुळे सर्वांवर भारी पडून एम. सी. स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता झाला. एम. सी. स्टॅन जिंकला असला तरीही प्रियंका चौधरीची जास्त चर्चा आहे. कारण स्वतः सलमान खानने प्रियंकाचं कौतुक केलंय.

(Even if Priyanka lost the bigg boss 16 trophy, Salman Khan said.. She won it for me )

प्रियंका जेव्हा घराबाहेर आली तेव्हा घरातील सर्व सदस्यांना शॉक बसलेला. अंकितला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्याचाही चेहरा पडला होता. मग सलमान खान म्हणाला,"प्रियंका हसत हसत घराबाहेर पडतेय. आपण सर्वांनी तिच्याकडून शिकल पाहिजे. एवढी स्ट्रॉंग असणाऱ्या अर्चनाला सुद्धा बाहेर पडताना रडू कोसळलं,"

सलमान खान पुढे म्हणाला,"तुम्ही असे उदास चेहरे घेऊन बसलात तर बाहेर आल्यावर तिला खूप वाईट वाटेल. ती खुप स्ट्रॉंग आहे. तिचे साथीदार, मित्र सर्व बाहेर गेले. पण ती एकटी लढत राहिली. खेळत राहिली. त्यामुळे प्रियंकाने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नसली तरी माझ्यासाठी विजेती तीच आहे." असं म्हणत सलमान खानने प्रियंकाचं कौतुक केलं

बिग बॉस 16 मधून प्रियंका चौधरी टॉप ३ म्हणून घराबाहेर गेली आहे. प्रियंकाच्या फॅन्सना तीच जिंकेल असं वाटत होतं. प्रियंकाचं स्वप्न भंगल असल्याने तिच्या फॅन्सची प्रचंड निराशा झाली आहे. प्रियंका फायनलची दावेदार होती. शिव ठाकरे आणि प्रियंका टॉप २ मध्ये असतील असं अनेकांनी भाकीत केलं होतं. पण प्रियंका घराबाहेर गेल्याने सर्वांना धक्का बसला..

एमसी स्टॅनने ' बिग बॉस 16" च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तर मराठी बिग बॉस विजेता अमरावतीचा शिव ठाकरे हा फर्स्ट रनर अप ठरला आहे. अभिनेता सलमान खान याने रविवारी रात्री एका दिमाखदार सोहळ्यात विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. प्रियंका बिग बॉस १६ ची टॉप ३ ठरली आहे

टॅग्स :Big Bosssalman khan