सावळ्या रंगावर स्पष्टीकरण देणा-या सुहानाला ट्रोलर्स म्हणाले, 'आधी शाहरुखला सांग फेअरनेस क्रीमची जाहीरात करणं बंद कर'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 1 October 2020

सुहानाने या ट्रोलर्सना उत्तर देत तिला तिच्या रंगाचा अभिमान असल्याचं म्हटलं होतं. आता सुहाना पुन्हा ट्रोल होतेय ती शाहरुख खानमुळे. 

मुंबई- शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने वर्णभेदावरुन ट्रोलर्सला उत्तर देणारी पोस्ट केली होती. सोशल मिडियावर तिने भलीमोठी पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की वर्णभेदाचा मुद्दा संपवला पाहिजे. शाहरुखची मुलगी सुहाना खानला लोक तिच्या सावळ्या रंगामुळे अनेकदा ट्रोल करत असतात. तिला वाईट कमेंट करतात. तिने तिच्या पोस्टमध्ये ट्रोलर्सच्या कमेंट्स देखील लिहिल्या होत्या त्यात एकाने तिला 'काली चुडैल' असं म्हटलं होतं. सुहानाने या ट्रोलर्सला उत्तर देत तिला तिच्या रंगाचा अभिमान असल्याचं म्हटलं होतं. आता सुहाना पुन्हा ट्रोल होतेय ती शाहरुख खानमुळे. 

हे ही वाचा: आमिर खानने शेअर केला व्हिडिओ, 'पाणी फाऊंडेशनमुळे' साता-यातील गावात नापीक जमिनीचं झालं जंगलात रुपांतर  

सुहाना खानचे वडिल आणि अभिनेता शाहरुख खान गोरं होण्याच्या क्रीमची जाहीरात करतो. या जाहीरातीतून सांगितलं जातं की जर त्यांनी या क्रिमचा वापर केला तर त्यांची त्वचा गोरी होईल. याच जाहीरातीचं उदाहरण देत यूजर्स आता सुहानाला ट्रोल करत आहेत. शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेता हृतिक रोशन, कार्तिक आर्यन देखील फेअरनेस क्रीमचं प्रमोशन करतात.

एका ट्विटर युजरने म्हटलंय की, 'मी सुहाना खानशी सहमत आहे. त्वचेच्या रंगावर ज्या गोष्टी बोलल्या जातात त्यावर तिने आवाज उठवला आहे आणि तो योग्य आहे. मात्र मला असं वाटतं की हा मुद्दा संपवण्याची सुरुवात तिने तिच्या घरातून करावी. तुम्ही समाजाला अशा प्रकारे जबाबदार ठरवू शकत नाही कारण इथे तुझे वडिलंच गोरं होणा-या क्रीमची वर्षानुवर्षे जाहीरात करत आहेत.'

As Suhana Khan Slams Trolls Who Called Her 'Kaali,' People Ask SRK To Not  Promote Fairness Creams

एका दुस-या युजरने म्हटलंय, 'पहिले तुझ्या वडिलांना गोरं होणा-या क्रीमचं प्रमोशन बंद करायला सांग. विचित्र गोष्ट आहे, वडिल फेअरनेस क्रीमचं प्रमोशन करतात आणि मुलगी वर्णभेद संपवण्याच्या पोस्ट करते. तुझ्या वडिलांनी कित्येक वर्षांपासून काळ्या लोकांची खिल्ली उडवली आहे.'   

fairness cream brand ambassador shah rukh khan daughter suhana khan again troll for having brown skin  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fairness cream brand ambassador shah rukh khans daughter suhana khan again troll for having brown skin