ऐश्वर्याने आत्महत्या केल्याच्या अफवा

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या अफवा सध्या येत आहेत. आऊटलूक पाकिस्तानसह इतर काही संकेतस्थळांनी यासंदर्भातील दिशाभूल करणारे वृत्त काल (रविवार) प्रसिद्ध केले आहे. 

ऐश्वर्याने स्वतःचे आयुष्य संपवून टाकण्यासाठी ट्रँक्विलायझर हे औषध अधिक प्रमाणात घेतले. तसेच बच्चन कुटुंबियांना जेव्हा हे कळाले तेव्हा उपचारासाठी त्यांनी डॉक्टरांना घरी बोलाविले असल्याचे तारे देखील या संकेतस्थळांनी तोडले आहेत. 

ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात रणबीरसोबत चित्रित केलेली बोल्ड दृश्ये बच्चन कुटुंबियांना पसंत नसल्याने तिच्या वैवाहिक जीवनात तणावग्रस्त वारावरण असल्याचे या संकेतस्थळांवर सांगण्यात आले आहे. यामुळे ऐश्वर्या तिच्या वैवाहिक जीवनाला कंटाळली होती, आणि तिने असे कृत्य केल्याचे यामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, डिझायनर मनीष मल्होत्रा याने काल (रविवार) दिलेल्या पार्टीत ऐश्वर्या हजर असल्याने या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

Web Title: Fake reports claim actor Aishwarya Rai Bachchan committed suicide