गळफास घेऊन बॉलीवुड अभिनेता आसिफ बसरा यांची आत्महत्या

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 12 November 2020

गेल्या पाच वर्षांपासून बसरा हे आपल्या एका परदेशी मैत्रिणीसोबत मैक्लोडगंज  येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे याचा शोध पोलीसांकडून घेतला जात आहे.

मुंबई - परझानिया, ब्लॅक फ्रायडे, वन्स ऑपोन ए टाइम इन मुंबई चित्रपटांबरोबरच  पाताललोक सारख्या वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांना आपलेसे करणारे प्रख्यात अभिनेते आसिफ बसरा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहे. एक लोकप्रिय अभिनेता म्हणून आसिफ बसरा यांनी आपल्या अभिनयाची छाप रसिकांच्या मनावर उमटवली होती.

गेल्या पाच वर्षांपासून बसरा हे आपल्या एका परदेशी मैत्रिणीसोबत मैक्लोडगंज  येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे याचा शोध पोलीसांकडून घेतला जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हय़ातील धर्मशाळा येथे एका कॅफेजवळ त्यांनी आत्महत्या केली आहे. कांगडाचे एस पी विमुक्त रंजन यांनी अद्याप याबाबत कुठलीही खात्रीशीर माहिती मिळाली नसल्याचे सांगितले आहे.

आसिफ यांच्या आत्महत्येची बातमी कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्यांचा मृतदेह तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरु झाला आहे. त्यांच्या जाण्याने परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. गेल्या 5 वर्षांपासून आपल्या परकीय मैत्रिणीसोबत राहणा-या बसरा यांनी असे हे टोकाचे पाऊल का टाकले असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: famous actor Asif basara sucide in dharamshala