रहस्यकथांचे बादशहा गुरुनाथ नाईक काळाच्या पडद्याआड

त्यांच्या जाण्यानं मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे.
रहस्यकथांचे बादशहा गुरुनाथ नाईक काळाच्या पडद्याआड

मुंबई - आपल्या लेखणीनं मराठी वाचकांना वाचनाची गोडी लावणारे, रहस्यकथांनी वाचकांचे मनोविश्व समृद्ध करणारे प्रख्यात लेखक गुरुनाथ नाईक यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यानं मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी साहित्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या कलाकृतींनी साहित्य रसिकांना निखळ आनंद दिला. एक दोन नव्हे तर हजाराहून अधिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या नाईक हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते.

नाईक गेल्याचे कळताच मराठी साहित्य विश्वातून अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. ज्या लेखकानं वाचकांची पिढी निर्माण केली. वाचकवर्ग तयार केला त्या लेखकाचं मराठी भाषेसाठीचं योगदान मोठं आहे. अशा आशयाच्या प्रतिक्रिया यावेळी वेगवेगळ्या मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. लेखनाचा ध्यास शेवटपर्यत बाळगणाऱ्या नाईक यांना गेल्या वर्षी मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं.

मराठी साहित्यामध्ये रहस्यकथा लोकप्रिय करण्यात नाईक यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे ते ओळखले जाऊ लागले. साधारण 70 ते 80 च्या दशकामध्ये मराठी वाचकांना आपल्या वेगवेगळ्या साहित्यकृतींनी आकर्षित केले होते. त्यांच्या लेखनाची मोहिनी वाचकांवर होती. त्यामुळेच ते प्रचंड साहित्यसंपदा निर्माण करु शकले. १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. 84त्यावेळच्या दिग्गज लेखकांबरोबर त्यांचे नाव घेतले गेले. अनेकदा त्यांना वेगवेगळ्या कारणास्तव वादालाही सामोरं जावं लागल्याचे दिसून आले.

रहस्यकथांचे बादशहा गुरुनाथ नाईक काळाच्या पडद्याआड
'बागबान' चित्रपटाचे लेखक शफीक अन्सारी कालवश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com