'या' लोकप्रिय मालिकेचा होणार शेवट, अभिनेत्याची चाहत्यांसाठी भावूक पोस्ट !

famous serial is going to end soon actor shares emotional post on social media
famous serial is going to end soon actor shares emotional post on social media

मुंबई : छोट्या पडद्यावर मालिंकामधून प्रेक्षकांची मने जिंकणं हे काही सोप्प काम नाही. वर्षानोवर्षे मालिका सुरु असतात आणि प्रेक्षकांशी आपुलकीचं नातं जोडतात. 'स्टार प्लस' या वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका 'यै है महोब्बते' ही गेल्या 6 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण, या मालिकेच्या चाहत्यांसाठी नाराज करणारी बातमी. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. आता मालिकेचे निर्माते दुसरा सिझन घेऊन येणार आहेत. मालिकेतील मुख्य भूमिकेतील कलाकार रमन भल्ला, इशिता आणि रमनची  मुलगी रुही यांच्या आयुष्यावर हि मालिका आधारित आहे. तामिळ डॉक्टर इशिता आणि पंजाबी सीईओ रमण भल्ला यांची प्रेम कहाणी या मालिकेत दाखवली गेली आहे. 

मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'गे है चाहते' असं त्याचं नाव असणार आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र सध्याची मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते काहीसे नाराज आहेत. शिवाय कलाकारदेखील तितकेच नव्हर्स झाले आहेत. 

करण म्हणेच मालिकेतला रमन भल्ला याने मालिकेतील मुख्य भूमिकेतला करण पटेल याने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये करणने लिहिलं आहे की, ' साध्या पण स्टॉंग स्टोरीसह आम्ही मालिकेला सुरुवात केली आणि प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. रमन भल्लाला वेगळी ओळख मिळाली आणि प्रेक्षकाचं प्रेमही. ही फक्त मालिका नसून माझ्य़ासाठी ते घर आहे. पण, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट होतोच तसाच या मालिकेचा शेवट ही होत आहे. मालिकेचा निरोप घेण्याची वेळ आली आहे पण हे सहा वर्षांचं कनेक्शन मी शब्दांमध्ये मांडू शकत नाही.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you  #IWillMissYouYHM

A post shared by (@alygoni) on

मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये काय नवीन घडणार आणि सीझन प्रेक्षकांच्या पसंतीत उतरणार का हे बघावं लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com