
Kailash KherAttacked: स्टेजवर गाताना कैलाश खेर यांच्यावर कन्नडींगाचा जीवघेणा हल्ला...
प्रसिद्ध गायक कैलाश खेर हे सुफी संगीतातील एक लोकप्रिय नाव म्हणून ओळखले जातात. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांनी मोठं नाव कमावलं. त्यांची अनेक गाणी अजरामर आहेत आणि त्यांचा आवाज श्रोत्यांच्या काळजात ठसणारा आहे. कैलाश खेर स्टेजवर परफॉर्म करत असतांना त्याच्यावर काही तरुणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
कर्नाटकातील हंपी महोत्सवादरम्यान गायक कैलाश खेर यांच्यावर पाण्याची बाटली फेकण्यात आली . कैलाश खेर स्टेजवर परफॉर्म करत असतानाच दोन तरुणांनी त्यांना कन्नड गाणं गाण्याचा आग्रह केला होता. रविवार संध्याकाळी ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
तीन दिवस चाललेला हम्पी महोत्सव २७ जानेवारीपासून सुरू झाला आहे. विजयनगर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर प्रथमच तेथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाले.
कैलाश खेर यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट केले, ज्यामध्ये ते हम्पी उत्सवादरम्यान कन्नडमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. त्यांनी लिहिले, “जेव्हा कैलशाने पुनीत राजकुमार जी यांना संगीतमय आदरांजली दिली आणि त्यांच्यावर चित्रित केलेल्या आमच्या कन्नड गाण्यांची गाणी मालिका सादर केली. संपूर्ण विजयनगर कैलशासोबत गात आहे, नाचत आहे आणि भावूक होत आहे. कैलाश लाइव्ह कॉन्सर्टचा हंपी उत्सव 2023 चा शेवट खूपच भावूक होता."

बॉलीवूड आणि कन्नड चित्रपट उद्योगातील अनेक बड्या कलाकारांनी कार्यक्रमात परफॉर्म केले. कन्नड गायक अर्जुन, जन्या, विजय प्रकाश, रघु दीक्षित आणि अनन्या भट यांनी कार्यक्रमात विशेष परफॉर्मन्स दिला. याशिवाय बॉलिवूडमधील अरमान मलिक आणि कैलाश खेर या दिग्गजांनी लोकांचे मनोरंजन केले.