राजकारणी महिलेचा पती म्हटल्यावर कसे वाटते? अनुपम खेर यांना फॅनचा खोचक प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

अभिनेता अनुपम खेर व खासदार किरण खेर ह्यांच्या विवाहाला बरीच वर्ष झाली आहेत. पण त्यांच्या वैवाहिक जीवनबद्दल पहिल्यांदाच अनुपम खेर ह्यांनी ट्विटरच्या माह्यामातून खुलासा केला आहे. अनुपम खेर हे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात व आपल्या फॅन्सच्या प्रश्नांना नेहमी उत्तर देत असतात.  

पुणे : अभिनेता अनुपम खेर व खासदार किरण खेर ह्यांच्या विवाहाला बरीच वर्ष झाली आहेत. पण त्यांच्या वैवाहिक जीवनबद्दल पहिल्यांदाच अनुपम खेर ह्यांनी ट्विटरच्या माह्यामातून खुलासा केला आहे. अनुपम खेर हे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात व आपल्या फॅन्सच्या प्रश्नांना नेहमी उत्तर देत असतात.  

ट्विटरवरील प्रश्न उत्तरांच्या सत्रात, अश्याच एका फॅनने अनुपम खेर ह्यांना राजकारणी  महिला सोबतीला वैवाहिक जीवन बद्दल विचारण्यात आले. " ती घरात राजकारणी नसुन ती घरातील एक व्यक्ती आहे." असे उत्तर अनुपम खेर ह्यांनी आपल्या फॅन्सला दिले . 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

किरण खैर ह्या भाजपच्या खाजदार असून .त्या अभिनेत्री देखील आहेत. अजून एक ट्विट मध्ये फॅन ने अनुपान ह्यांना आपल्या किरण ह्यांना एका वाक्यात वर्णन करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी " ती अप्रतिम, प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्ती आहे" असे उत्तर दिले. 

अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे .आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात त्यांनी आगमन ह्या चित्रपटातून केली आहे .डर खेल सारख्या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाले आहे. तसेच किरण खेरने अभिनय क्षेत्रातील सुरुवात आसरा प्यारदा ह्या पंजाबी चित्रपटातून केली आहे. देवदास ह्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्यामत वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

पुण्यासह राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आता MSRDCकडे!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fan ask Anupam Kher How does a politician feel when called a politician woman husband