दीपिका पदूकोणकडे गोड बातमी? हा फोटो शेअर करत म्हणाली..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

नुकताच दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे जो सध्या चांगलाच चर्चेत आहे. दीपिकाच्या या फोटोवर चाहते तुटून पडले असून यावर कमेंट करत आहेत.

मुंबई- अभिनेत्री दीपिका पदूकोण पती रणवीर सिंगसोबत लॉकडाऊनमध्ये घरीच असल्याने मनसोक्त वेळ घालवत आहे. लॉकडाऊनमध्ये हे दोघंही सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह आहेत. दीपिका आणि रणवीर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करत आसतात. नुकताच दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे जो सध्या चांगलाच चर्चेत आहे. दीपिकाच्या या फोटोवर चाहते तुटून पडले असून यावर कमेंट करत आहेत. हा फोटो पाहून प्रेक्षकांना राहवलं नाही आणि त्यांनी त्यांच्या मनातले प्रश्न विचारायला सुरुवात केली

हे ही वाचा: प्रियांका चोप्राच्या काकांसोबत घडलं असं काही की पोलिसांनी दाखल केला गुन्हा

त्याचं झालं असं की दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन गोड-आंबट अशा कैरीचा फोटो शेअर केला आहे. दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहु शकता की या आंबट-गोड कैरीवर मीठ-मसाला लावलेली ही चटपटीत कैरी आहे. हा फोटो शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिल आहे, 'हे इतर कोणत्याही गोष्टीच्या तुलनेत सर्वात उत्तम आहे. कशाहीपेक्षा उत्तम ज्याला मी आत्तापर्यंत भेटली आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

You're simply the best, better than all the rest Better than anyone, anyone I ever met...

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाने शेअर केलेला हा फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरु केला. एका नेटक-याने दीपिकाला विचारलं, 'दीपिका प्रेग्नंट आहे का?' तर दुस-याने 'भावा गोड बातमीच्या तयारीला लागा, भाऊ आणि वहिनी मुलाच्या तयारीत आहेत.' याव्यतिरिक्त चाहत्यांनी वेगवेगळ्या मार्गाने एक प्रश्न दीपिकाला विचाराला की 'दीपिकाकडे काही गोड बातमी आहे का?' 

आता दीपिकाने असा आंबट-गोड पदार्थाचा फोटो टाकल्यावर त्यांच्या चाहत्यांच्या मनात एकंच प्रश्न येत होता. तसंच या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष आणखीनंच वेधून घेतलं. दीपिकााने साधं सरळ कॅप्शन न देता असं कॅप्शनने दिल्याने सगळेच विचारात पडले आणि दीपिकाच्या गोड बातमीची चर्चा सगळीकडे सुरु झाली.   

fans asked on deepika padukone picture is she expecting  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fans asked on deepika padukone picture is she expecting