फराह खानचा नवीन अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान सध्या इंडियन आयडॉल सीजन 9 चे परीक्षण करत आहे. याआधीही तिने अनेक रिऍलिटी शोचे परीक्षण केलेले आहे; पण या वेळी फराहचा साडीमधला लूक लक्षवेधी ठरणार आहे. विशेष म्हणजे ती पहिल्यांदाच टीव्हीवर साडीत दिसणार आहे. इंडियन आयडॉलचे स्पर्धक सध्या अंदाज राऊंडसाठी तयारी करत आहेत. फराह म्हणते हीच ती योग्य वेळ होती माझा नवीन अंदाज दाखविण्याची. तिने या शोमध्ये काळ्या रंगाची लाल काठ असलेली मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली साडी नेसली आहे. तिचा हा नवीन अंदाज पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतील. 
 
Web Title: Farah khan new look in indian idol

टॅग्स