वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर करणा-या कलाकारांवर भडकली फराह खान, म्हणाली 'बस्स करा आता..'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सोशल मिडियावर सध्या फिटनेस संबंधित आलेल्या सगळ्यांच्या सल्ल्यांची ही लाट पाहता कोरिओग्राफर फराह खानने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे..

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे..त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटी सोशल मिडीयावर चांगलेच ऍक्टीव्ह झाले आहेत..यात काही सेलिब्रिटी कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी जागरुकतेचे व्हिडिओ शेअर करत आहेत तर काही सेलिब्रिटी मजेशीर अंदाजात घरी वेळ कसा घालवू शकाल याचे सल्ले देत आहेत..

मात्र या सगळ्यांव्यतिरिक्त जास्त प्रमाणात जर सेलिब्रिटी काही शेअर करत असतील ते त्यांचे फिटनेसशी संबंधित व्हिडिओ..अनेक सेलब्रिटी वेगवेगळ्या प्रकारे सध्याच्या या सेल्फ क्वारंटाईनमध्ये घरच्या घरी फिट राहण्यासाठी काय काय करु शकतात याबाबतचे व्हिडिओ शेअर करताना दिसून येत आहेत..

हे ही वाचा: सेल्फ क्वारंटाईनमध्ये भांडी घासल्यानंतर आता कतरिनाने हातात घेतला झाडू

सेलिब्रिटींना त्यांच्या करिअरसाठी फिटनेस किती गरजेचा असतो हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे.. आणि म्हणूनंच सध्याच्या या कठीण परिस्थितीत कतरिना कैफ पासून, सिद्धार्थ मल्होत्रा, अमिताभ बच्चन पर्यंत सगळे सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांना घरात राहून व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत..सोशल मिडियावर सध्या फिटनेस संबंधित आलेल्या सगळ्यांच्या सल्ल्यांची ही लाट पाहता कोरिओग्राफर फराह खानने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे..या व्हिडिओमध्ये फराह खान सांगतेय की, 'जर आता सेलिब्रिटींनी हे व्हिडिओ पोस्ट करणं बंद नाही केलं तर मी त्यांना अनफॉलो करेन..'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

BAS KARO yeh workout videos !! video shot by :- #diva

A post shared by Farah Khan Kun

der (@farahkhankunder) on

या व्हिडिओमध्ये फराह सांगतेय..'या कठीण परिस्थितीत जगात आणखीनही बरीच समस्या आहेत...बरेचसे सेलिब्रिटी घरात व्यायाम करत असतानाचे व्हिडिओ पोस्ट करत आहेत..तुमच्या फिगर व्यतिरिक्त अशा ब-याच समस्या आहेत ज्याने लोकं हैराण आहेत.'फराह खानने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही क्षणातंच व्हायरल झाला..यावर सेलिब्रिटींच्या मजेशीर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत..

Image result for bollywood celebrity home workout videos during quarantine

यावर प्रतिक्रिया देत अर्जुनने म्हटलंय, 'फराह तुला लवकरात लवकर जीमला जाण्याची गरज आहे जी तुझ्या घराखाली आहे'..यावर उत्तर म्हणून फराहने लिहिलंय, 'लॉकडाऊन आहे याचा अर्थ असा की घराच्या बाहेर पाऊल ठेऊ नका..' अर्जुन व्यतिरिक्त मलाईका अरोरा, सोनम कपूर आणि करण जोहर सारख्या सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की, 'फराह तु कमाल आहेस'.

farah khan shares video and worns bollywood celebs  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farah khan shares video and worns bollywood celebs