फराहचा वर्किंग हॉलिडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

फराह खान फक्त कोरियोग्राफरच नव्हे तर निर्माती म्हणूनदेखील बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. फराह तिच्या प्रत्येक कामाशी प्रामाणिक असते. फराह सध्या लंडनमध्ये तिच्या कुटुंबीयांसोबत हॉलिडे एन्जॉय करतेयं. त्याचबरोबर ती लंडनमध्ये कुटुंबाला पुरेसा वेळ देत तिचं कामसुद्धा पूर्ण करणार आहे.

फराह तिच्या भावाच्या आगामी चित्रपटातील गाणं कोरियोग्राफ करणार आहे. या गाण्याचं शूटिंग लंडनमध्ये पाच दिवस चालणार आहे. फराह त्यासाठी फार मेहनतही घेतेय. या गाण्यात 100 ते 200 डान्सर्स डान्स करताना दिसतील. चित्रपटाच्या या गाण्यासाठी मोठा सेट उभारण्याचं काम सध्या लंडनमध्ये सुरू आहे. फराह या चित्रपटातील गाणं कोरियोग्राफ करण्यास फार उत्साही आहे. फराह लंडनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत असली तरी तिने तिच्या कामालाही प्रथम प्राधान्य दिलंय.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farah s working holiday

टॅग्स