
फरहानने २००० साली अधुना भभानीसोबत लग्न केलं. फरहान आणि अधुनाला दोन मुलं आहेत. मात्र २०१७ मध्ये फरहान आणि अधुना यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला.
मुंबई- अभिनेता, लेखक, गायक आणि निर्माता फरहान अख्तरचा जन्म ९ जानेवारी १९७४ रोजी झाला होता. यावर्षी फरहान त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. फरहान अख्तरने त्याच्या करिअरमध्ये सिने इंडस्ट्रीतील प्रत्येक गोष्ट आजमावून पाहिली आहे आणि त्यात यशस्वी देखील झाला आहे. फरहानच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खाजगी आयुष्य चर्चेत राहिलं आहे. फरहानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या काही खास गोष्टींविषयी..
हे ही वाचा: गायक गुरु रांधवाच्या 'त्या' मिस्ट्री गर्लचा खुलासा
फरहान अख्तर जावेद अख्तर आणि हनी ईरानी यांचा मुलगा आहे. त्याने केवळ १७ वर्षांचा असताना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर २००१ मध्ये पहिला सिनेमा दिल चाहता है या सिनेमाने तो दिग्दर्शनात उतरला. त्याचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला. त्यानंतर फरहानने कित्येक सिनेमे बनवले आणि त्याचा दिग्दर्शनचा प्रवास हिट ठरला. फरहानला केवळ दिग्दर्शक म्हणून त्याची ओळख बनवायची नव्हती. त्याने लेखन, गायन आणि अभिनयात देखील त्याचं नशीब आजमावलं. फरहान त्याच्या प्रत्येक रुपात यशस्वीच झाला.
या सगळ्यासोबतंच फरहान नेहमीच त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. फरहानने २००० साली अधुना भभानीसोबत लग्न केलं. फरहान आणि अधुनाला दोन मुलं आहेत. मात्र २०१७ मध्ये फरहान आणि अधुना यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. फरहान आणि अधुना यांच्या घटस्फोटाचं कारण त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं म्हटलं गेलं. मात्र दाघांनीही याबाबत कधीच खुलेआम चर्चा केली नाही. या दोघांच्या घटस्फोटावेळी सांगितलं गेलं की फरहानचं अफेअर श्रद्धा कपूरसोबत होतं. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला.
गेल्या काही दिवसांपासून फरहान मॉडेल आणि अभिनेत्री शिबानी दांडेकरला डेट करत आहे. दोघांचे फोटो अनेकदा सोशल मिडिया साईटवर एकत्र दिसून येतात. दोघांच्या लग्नाबाबत देखील अनेकदा चर्चा ऐकायला मिळत आहे मात्र दोघांनीही यावर मौन बाळगलं आहे.
farhan akhtar birthday special know why actor get divorce from wife adhuna and now dating shibani dandekar