अखेर मुहूर्त मिळाला... 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

"रॉक ऑन' चित्रपटातून फरहान अख्तरने तब्बल आठ वर्षांपूर्वी अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याचे "लक बाय चान्स', "शादी के साईड इफेक्‍टस्‌', "भाग मिल्खा भाग', "जिंदगी ना मिलेगी दोबारा', "वजीर' असे एकाहून एक सरस चित्रपट आले. पण ज्या "रॉक ऑन'मधून त्याने अभिनयात पदार्पण केले तो चित्रपट खरा त्याच्या अभिनयातील पदार्पणाचा चित्रपट नव्हताच. त्याआधी त्याने "फकिर ऑफ वेनिस' हा चित्रपट करण्याचं ठरवलं होतं. "रॉक ऑन'नंतर फरहानचा "रॉक ऑन 2' ही आला. पण हा चित्रपट गेली नऊ वर्षे प्रदर्शित झालाच नाही. शेवटी या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे.

"रॉक ऑन' चित्रपटातून फरहान अख्तरने तब्बल आठ वर्षांपूर्वी अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याचे "लक बाय चान्स', "शादी के साईड इफेक्‍टस्‌', "भाग मिल्खा भाग', "जिंदगी ना मिलेगी दोबारा', "वजीर' असे एकाहून एक सरस चित्रपट आले. पण ज्या "रॉक ऑन'मधून त्याने अभिनयात पदार्पण केले तो चित्रपट खरा त्याच्या अभिनयातील पदार्पणाचा चित्रपट नव्हताच. त्याआधी त्याने "फकिर ऑफ वेनिस' हा चित्रपट करण्याचं ठरवलं होतं. "रॉक ऑन'नंतर फरहानचा "रॉक ऑन 2' ही आला. पण हा चित्रपट गेली नऊ वर्षे प्रदर्शित झालाच नाही. शेवटी या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. येत्या 10 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, अशी चर्चा आहे. या चित्रपटात अन्नू कपूरचीही भूमिका आहे.  
 

Web Title: Farhan akhtar finally give his time

टॅग्स