तुमचं धाडस झालंच कसं? फरहानने भाजप नेत्याला विचारला सवाल

farhan
farhan

मुंबई : एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी मनोरंजनसृष्टीतल्या कलाकारांना टोमणा मारला. मर्सलचा विषय निघाल्यावर सिनेसृष्टीतल्या लोकांचा आयक्यू जरा कमीच असतो. त्यांना सामान्य ज्ञानही फार नसतं असं सांगून एकच वाद ओढवून घेतला. या स्टेटमेंटनंतर मनोरंजनसृष्टी यावर कशी व्यक्त होते याकडे सर्वांचं लक्ष होतं. यात पहिली बाजी मारली आहे ती फरहान अख्तरने. 

त्याने ट्विटरवर याचा समाचार घेताना हाऊ डेअर यू सर असा सवाल विचारला आहे. शिवाय जीव्हीएल कार्यक्रमात नेमकं काय बोलले त्याची लिंकही त्याने आपल्या अकाउंटवर शेअर केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप इतर कोणी कलाकार फार व्यक्त झालेले नाहीत. पण फरहाननंतर हळूहळू एकेक जण बोलू लागला आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com