फरान अख्तरचं दुसरं लग्न होणार 'या' मराठमोळ्या मॉडेलशी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

बॉलिवूडचा अभिनेता फरहान अख्तर एका मराठमोळ्या मॉडेलशी लग्न करणार असल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु आहे. जाणून घ्या फरहान नक्की कोण होणार आहे फरहानची जीवनसाथी !​

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेकजण लग्नबंधनात अडकत आहेत. बॉलिवूडमध्ये डेटिंग आणि ब्रेकअप हे नवीन नाही. घटस्फोटानंतरही अनेक कलाकारांना त्यांचे प्रेम मिळण्यात यश आलं आहे. अनुष्का-विराट, प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर नंतर आता आणखी एक क्युट कपल लग्न करणार आहेत. बॉलिवूडचा अभिनेता फरहान अख्तर एका मराठमोळ्या मॉडेलशी लग्न करणार असल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु आहे. जाणून घ्या फरहान नक्की कोण होणार आहे फरहानची जीवनसाथी !

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday my better half .. thank you for all the magic, laughter and love you have brought to my life .. you are one of the most beautiful souls I have ever met and the world really needs more like you! I’ve never met anyone as kind, as attentive, as selfless, as brave and as focused as you.. Just being around you has taught me so much ( mainly patience!!) You inspire me! thank you for including me in every part of your life, for making me feel so special and for always making time for ‘us’ !! Having said that you do need to ‘unclench’ a little.. be more ‘free flowing’ To many more sessions in the ring, savouring protein bars together,late night walks with Jim Jam, Jlo movies, finishing my word crossy and foot rubs!! Love you my Foo always Can’t wait for the next round  @faroutakhtar photo by @errikosandreouphoto style by @pashamalwani HMU @mallikajolly @azima_toppo shibani’s outfit - @dior Farhan’s shirt @hemantandnandita Trousers @bodicebodice

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

फरहान अख्तर गेल्या दोन वर्षांपासून मॉडेल शिबानी दांडेकरला डेट करत आहे. रिलेशनशिपमध्ये आल्यावर सुरुवातीला या दोघांनी नात सर्वांपासून लपवून ठेवलं. नंतर मात्र आपल्या नात्याचा खुलासा त्यांनी केला. एकमेकांसोबत ते अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. शिवाय सोशल मीडियावरही दोघं एकमेकांसोबतचे क्युट फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी शिबानी फरहानच्या परिवारासोबतही दिसली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Merry Christmas from the Mad-Hatters .. #seasonsgreetings

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

'मुंबई मिरर' मध्ये आलेल्या माहितीनुसार दोन वर्षे डेट केल्यानंतर आता शिबानी आणि फरहान यांनी 2020 मध्ये लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडते. दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात देखील झाली आहे अशी चर्चा सुरु आहे. पण, लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. 

Image may contain: 4 people, people smiling, people standing and indoor

फरहान अख्तरचा घटस्फोट झाला असून त्याला दोन गोंडस मुली आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव अधुना होते. अधुना आणि फरहान यांनी 2002 मध्ये लग्न केलं होतं आणि 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांचा घटस्फोट झाला. 
शिबानीच्या आधीही फरहान रिलेशनशिपमध्ये होता. तो अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करत असल्याची चर्चा होती. पण त्या दोघांनी अधिकृतपणे रिलेशनशिपची माहिती दिली नाही. 

Image may contain: 2 people, people smiling, sunglasses, close-up and outdoor

शिबानी एक गायक, अभिनेत्री, अॅंकर आणि मॉडेल आहे. अमेरिकेतील एका मोठ्या टेलिव्हिजन शोच्या सुत्रसंचलनाने तिने करीअरला सुरुवात केली. भारतातही तिने अनेक गाणी आणि शोचं सुत्रसंचलन केलं आहे. शिवाय ती अनेक मोठ्या ब्रॅंडसाठी मॉडेलिंग करते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 @faroutakhtar @sashajairam @khyatibusa @divyakdsouza @anishaachhabriamakeup @reenadutta123 @azima_toppo

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

फरहानचा 'दि स्काय इज पिंक' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रियांका चोप्रासोबत तो मुख्य भूमिकेत दिसला. जिंदगी ना मिलेगी दोबारा, भाग मिल्खा भाग, रॉक ऑन, वझीर, दिल धडकने दो असे अनेक सुपरहिट सिनेमे फरहानने केले आहेत. दिग्गज स्क्रिनरायटर जावेद अख्तर यांचा फरहान मुलगा आहे. तर, दिग्दर्शक झोया अख्तर त्याची सख्खी बहिण आहे. 

Image may contain: 2 people, people smiling, beard and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farhan akhtar to knot tie with this marathi model