तुम्ही 'दिल चाहता है'ला 17 वर्षात भरभरून प्रेम दिलंत...- फरहान अख्तर

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

24 जुलै 2001 साली 'दिल चाहता है' प्रदर्शित झाला. तरूणाईने या चित्रपटाला डोक्यावर घेतले. आजही तितक्याच उत्साहाने दिल चाहता है बघणारा प्रेक्षकवर्ग आहे. आमीर खान, अक्षय खन्ना, सैफअली खान, प्रिती झिंटा, डिंपल कपाडीया, सोनाली कुलकर्णी अशी तगडी कलाकार मंडळी घेऊन काढलेला दिल चाहता है हा आजही तितकाच लोकप्रिय आहे.

मैत्रीवर बिनधास्त बोलणारा, मैत्रीचे सर्व कंगोरे टिपणारा व कायम मैत्रीवरील हिट चित्रपट देणाऱ्या फरहान अख्तर याने 2001 साली त्याने दिग्दर्शित केलेल्या 'दिल चाहता है' या चित्रपटाला 17 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ट्विट केले आहे. '17 वर्षांपूर्वी दिल चाहता है प्रदर्शित झाला. तुम्ही सिनेमाला इतके प्रेम दिले आहे की, त्यासाठी मी धन्यावादही मानू शकत नाही', असे त्याने ट्विट मध्ये म्हणले आहे. 

24 जुलै 2001 साली 'दिल चाहता है' प्रदर्शित झाला. तरूणाईने या चित्रपटाला डोक्यावर घेतले. आजही तितक्याच उत्साहाने दिल चाहता है बघणारा प्रेक्षकवर्ग आहे. आमीर खान, अक्षय खन्ना, सैफअली खान, प्रिती झिंटा, डिंपल कपाडीया, सोनाली कुलकर्णी अशी तगडी कलाकार मंडळी घेऊन काढलेला दिल चाहता है हा आजही तितकाच लोकप्रिय आहे.

 dil chahta hai

'दिल चाहता है'च्या कथानकाप्रमाणेच त्याची गाणीही खूप गाजली. शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोक तितक्याच आवडीने ऐकतात आणि बघतातही. याच सगळ्याची आठवण म्हणून आज 'दिल चाहता है'चा  दिग्दर्शक फरहान अख्तर याने सिनेमाला 17 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ट्विट करत या आठवणींना उजाळा दिला आहे.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farhan akhtar tweeted for 17 years completed of dil chahta hai