आशुतोषचा नवा चित्रपट 

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

नावाजलेला दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आता ऐतिहासिक विषयांचे चित्रपट न बनवता काहीतरी वेगळे करण्याच्या मूडमध्ये आहे. "मोहेन्जोदारो'नंतर तो परत येतोय एक नवीन चित्रपट घेऊन. कोण असेल त्याचा हिरो? हा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल, तर तो दुसरा-तिसरा कोणी नसून फरहान अख्तर आहे. फरहान आणि आशुतोष हे दोघेही ताकदीचे दिग्दर्शक आहेत. त्यामुळे हा चित्रपट बॉलीवूडमध्ये काहीतरी चमत्कार नक्कीच करणार यात शंका नाही. आणखी अजून एक सरप्राईज म्हणजे फरहान हा "वझीर'नंतर पहिल्यांदाच ऍक्‍शन अवतारात दिसणार आहे.

एका चांगल्या दिग्दर्शकाला दुसरा चांगला दिग्दर्शक दिग्दर्शित करणार म्हणजे हा चित्रपट काहीतरी कमाल करणार हे निश्‍चित! हा चित्रपट युरोपमध्ये चित्रीत होणार आहे; तर फरहानबरोबर आणखी कोण काम करणार हे अजून निश्‍चित झालेले नाही. गेले दोन महिने फरहान आणि आशुतोष या चित्रपटासंदर्भात बोलणी करत आहेत. सध्या फरहान त्याच्या लखनौ सेंट्रल या चित्रपटाच्या चित्रीकरणात खूपच बिझी आहे; पण हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होईल, असे सूत्रांनी सांगितले.  

Web Title: Farhan to be part of Ashutosh Gowariker's next film