फरहानला मिळाली म्युझिकल ट्रीट 

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

"मुघल- ए- आझम' या के. असीफ यांच्या क्‍लासिक चित्रपटावर "मुघल- ए- आझम द म्युझिकल' हे ब्रॉडवे स्टाईल नाटक नुकतेच मुंबईतील एनसीपीएमध्ये सादर झाले.

बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावली होती. फरहान अख्तर त्याच्या सगळ्या चित्रपटांत काही ना काही वेगळे करत असतोच. हे नाटक पाहिल्यावर तो भारावून गेला.

त्याने लगेचच सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याला हे नाटक खूपच भावले. तो म्हणाला, या नाटकाचे सेट नेत्रदीपक आहेत आणि ज्या प्रकारे ही कथा नृत्य आणि गाण्यांच्या माध्यमातून पुढे सरकते ते पाहताना खूप आनंद होतो. त्याने लगेचच या नाटकातील कथ्थक नृत्यांगनांबरोबर फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.

"मुघल- ए- आझम द म्युझिकल'चे दिग्दर्शन फिरोज अब्बास खान याने केले आहे. तर शापुरजी पिलोंजी यांनी त्याची निर्मिती केली आहे. फरहानला मिळालेली ही एक प्रकारे म्युझिकल ट्रीट होती. 

Web Title: Farhan received a musical treat