वरुण धवनशी लग्न करणारी नताशा दलाल आहे तरी कोण?

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 24 January 2021

वरुणनं नताशाला गेल्या वर्षी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या होत्या. आता त्यानं तिचा आणि तिच्या आवडत्या डॉगीचा फोटो इंस्टावर शेयर केला आहे.  

मुंबई - बॉलीवूडमधील सेलिब्रेटींची लग्नं ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा कुतूहलाचा विषय असतात. त्यांचे लग्नाचे ठिकाण, त्या लग्नाला आलेले मान्यवर पाहुणे, त्याचे फोटो पाहायला त्यांना आवडते. आपला आवडता अभिनेता, अभिनेत्री ज्याच्याशी विवाहबध्द होणार आहे तो / ती कोण आहे हे जाणून घेण्याची त्यांना कमालीची उत्सुकता असते. सध्या प्रसिध्द दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन याच्या लग्नाची चर्चा जोरदारपणे सोशल मीडियावर सुरु आहे. अलिबाग येथील एका रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

वरुण त्याची मैत्रिण नताशा दलाल हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. वरुणशी लग्न करणारी नताशा दलाल आहे तरी कोण, ती कोणी मोठी सेलिब्रेटी नाही तर एक फॅशन डिझायनर म्हणून तिची ओळख आहे.

आज 24 जानेवारीला ती वरुणशी लग्न करणार आहे.  मुंबईमध्ये काम करणारी नताशा हिनं फॅशनविषयक डिप्लोमाचं शिक्षण हे न्युयॉर्क येथून घेतलं आहे. तिथं तिनं 10 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं आहे.

 2013 मध्ये ती भारतात आली. भारतात तिनं स्वताचं घर घेतलं आहे. विशेष म्हणजे तिनं लग्नासाठी खास ड्रेसही तयार केला आहे. वरुण आणि नताशा हे शाळेत असल्यापासूनचे मित्र आहेत.

ज्यावेळी कुली नं 1 चित्रपटाची शुटिंग सुरु होती तेव्हापासून काही काळ ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. वरुणनं ही गोष्ट करिना कपूरच्या एका चॅट शो मध्ये सांगितली होती. ते दोघेही बराच काळ मित्र असल्यानं त्यांच्याविषयी फारशी काही चर्चा नव्हती.

Natasha Dalal Wiki, Age, Boyfriend, Family, Caste, Biography & More –  WikiBio

आता गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील मैत्रीचं नात हे प्रेमात रुपांतरीत झालं. वरुणनंही सोशल मीडियावरुन त्याचा अनेकदा खुलासा केला आहे.

Marriage is on cards: Varun Dhawan's girlfriend Natasha Dalal explains when  they became 'more than good friends'

वरुण आणि नताशा यांनी आपल्या नात्याची माहिती बराच काळ सोशल मीडियापासून लांब ठेवली. त्याविषयी कुठेही वाच्यता करायची नाही असे त्यांनी ठरवले होते.

Varun Dhawan, Natasha Dalal wedding update: Couple leave for Alibaug with  family | People News | Zee News

आपल्या नात्याला लाईमलाईट पासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट नताशानंही लक्षात ठेवली. तिनंही आपल्या सोशल मीडियाच्या कुठल्याही अकाउंटवरुन नात्याची कबूली दिली नाही.

Varun Dhawan-Natasha Dalal wedding live updates: Varun Dhawan chills with  his gang of boys in Alibaug : #VarunKiShaadi:Here are some details about  Varun Dhawan and Natasha Dalal's wedding festivities! - The Times

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वरुण आणि नताशाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर वरुणनं सोशल मीडियावर त्यासंबंधीची एक पोस्ट शेयर केली होती.

Natasha Dalal (Varun Dhawan's Girlfriend) Height, Weight, Age, Biography &  More » StarsUnfolded

वरुणनं नताशाला गेल्या वर्षी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या होत्या. आता त्यानं तिचा आणि तिच्या आवडत्या डॉगीचा फोटो इंस्टावर शेयर केला आहे.  
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fashion designer Natasha Dalal is set to marry actor Varun Dhawan on January 24.