esakal | फॅशन डिझायनर सत्या पॉल काळाच्या पडद्याआड 
sakal

बोलून बातमी शोधा

Fashion designer Satya Paul passes away in Coimbatore

डिसेंबर मध्ये सत्या यांना हद्यविकाराचा झटका आला होता. त्यांना सदगुरु जग्गी वासुदेव यांनीही श्रध्दांजली वाहिली आहे. सोशल मीडियातूनही पॉल यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. 

फॅशन डिझायनर सत्या पॉल काळाच्या पडद्याआड 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - फॅशन डिझाईनच्या जगतात साडीला महत्वाचे आणि मानाचं स्थान मिळवून देणारे प्रख्यात फॅशन डिझायनर सत्या पॉल यांचे निधन झाले आहे. कोईम्बतुर येथील इशा योगा सेंटर येथे वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फॅशन डिझायनिंग व्यवसायात आपल्या कामानं वेगळी ओळख निर्माण करणा-या पॉल यांच्या जाण्यानं मोठी पोकळी तयार झाली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून हद्यविकारानं त्रस्त होते. त्यावर उपचार करुनही काळानं त्यांच्यावर झडप घातली.

डिसेंबर मध्ये सत्या यांना हद्यविकाराचा झटका आला होता. त्यांना सदगुरु जग्गी वासुदेव यांनीही श्रध्दांजली वाहिली आहे. सोशल मीडियातूनही पॉल यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. सदगुरु यांनी म्हटले आहे की, अदम्य इच्छाशक्ती आणि संघर्ष यासाठी सत्या पॉल यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचा जगण्यासाठी चाललेला अखंड संघर्ष हा सर्वांना प्रेरणा देणारा आहे. त्यासाठी त्यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. पॉल यांच्या जाण्यानं आपण एका महान कलाकाराला मुकलो आहोत. भारतीय फॅशन जगतात एक वेगळं स्थान निर्माण करण्याचे श्रेय या कलाकाराला द्यायला हवे. फार मोठे काम त्यांनी करुन ठेवले आहे. त्या कामाची दखल घ्यायला हवी. त्याविषयी पुढील पिढीला सांगायला हवे की आपण एका महान कलाकार कायमचा गमावला आहे.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीनुसार सत्या एका रुग्णलयात हद्यविकाराच्या आजारानं त्रस्त होते. तिथं ते बरे झाल्यानंतर त्यांना योगा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. पॉल यांचा मुलगा पुनित नंदा यांनी सांगितले की, त्यांना 2 डिसेंबर रोजी हद्यविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यांनाही अधिक काळ रुग्णालयात थांबायचे नव्हते. आणि ते योगा सेंटरमध्ये दाखल झाले होते. तिथं ते 2015 पासून होते. 

' अखेर The Family Man 2 च्या प्रदर्शनाची तारीख ठरली'

अनेक लोकं ही फॅशन डिझायनर नाहीत तर ती केवळ धंदेवाईक माणसे आहेत. 70 च्या दशकात आपल्या कामानं फॅशनच्या दूनियेत वेगळा ठसा उमटविणा-या सत्या यांच्यासारख्या माणसाची गरज फॅशन इंडस्ट्रीला आहे. ते महान विचारवंत जे कृष्णमुर्ती यांना मानणारे होते. तसेच त्यांनी आचार्य रजनीश यांच्याकडूनही धडे घेतले होते. 2015 मध्ये त्यांनी स्व खुशीनं योगाचा रस्ता निवडला होता. त्यावर चालण्याचा त्यांचा निर्धार शेवटपर्यत ठाम असल्याचेही नंदा यांनी सांगितले. 
 

loading image