Father's Day : 'फादर्स डे' निमित्त सुमीत राघवन झाला भावूक, म्हणाला कृपया..

वडील आणि मुलांविषयी सुमीतने सांगितल्या खास आठवणी.
actor sumeet raghvan shared emotional memory about his father and children
actor sumeet raghvan shared emotional memory about his father and children sakal

Father's day : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे विशेष योगदान असते. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी वडील अहोरात्र कष्ट घेत असतात. त्यामुळे फादर्स दे निमित्त आपण आपल्या वडिलांबाबत कृतज्ञता व्यक्त करतो. उद्या १९ जून रोजी जागतिक पितृ दिवस म्हणजेच फादर्स डे आहे. या निमित्त अभिनेता सुमीत राघवन याने आपल्या मुलांविषयी आणि वाडिलांविषयी काही भावूक आठवणी शेअर केल्या आहेत.

actor sumeet raghvan shared emotional memory about his father and children
अरे संसार संसार.. केदार शिंदेंनी सांगितली घरातील पहिल्या रेडिओची आठवण..

फादर्स डे कसा सेलिब्रेट करतो याबाबत एका मुलाखतीत सुमीत म्हणाला, 'फादर्स डे'च्या दिवशी जर शूटिंग नसेल तर मी मुलांसोबतच फादर्स डे साजरा करतो. मला असं वाटतं की मी मुलांना पाठिंबा देणारा एक चांगला बाप आहे. केवळ ऑफस्क्रीनच नाही तर ऑन-स्क्रीन असणाऱ्या सखी आणि अथर्वच्या बाबतीतही मी वडिलांची भूमिका चांगली बाजवतो. चिन्मय सध्या वागळे की दुनिया या मालिकेत काम करत असून तो सखी आणि अथर्वच्या वडिलांच्या भूमिकेत आहे.

actor sumeet raghvan shared emotional memory about his father and children
पालकच इंग्रजीचे संस्कार करत असतील तर 'मराठी' टिकेल कशी? अरुण नलावडे भडकले

पुढे त्याने काही वडिलांच्या आठवणी सांगितल्या आहेत, 'मी माझ्या वडिलांशी खूप आतून जोडलो गेलो आहे. माझ्यासाठी ते माझे सुपरहिरो आहेत. मला खात्री आहे, हे सांगणारा मी काही पहिला मुलगा नाही पण ते खरंच माझे हिरो आहेत. त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला खऱ्या अर्थाने आकार दिला आहे. माझ्या वडीलांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ते कधीही कोणावर रागावलेले मी पाहिले नाही. अगदी ८७ व्या वर्षीही तो आनंदात जगत आहेत. शांत राहा आणि प्रगती करा हा त्याचा मंत्र आहे. ते खरोखर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रेरणास्त्रोत आहेत. मी त्यांचे काही गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या आचरणातही आणतो. ते म्हणतात तुमच्या जीवनात येणार्‍या अडचणींना सामोरे जाण्यासाठी बलवान, संयमी असणं फार गरजेचं आहे आणि हाच वारसा मला माझ्या मुलांना द्यायचा आहे.'

फादर्स डे निमित्त त्यांने चाहत्यांसाठी एक संदेशही दिला आहे. तो म्हणतो, 'कृपया तुम्ही तुमच्या पालकांचा आदर करा कारण ते आपले गुरु आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणं आणि त्यांची काळजी घेणे हे आपलं कर्तव्य आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com