Pulwama Terror Attack : गोरेगाव फिल्मसिटी बंद; पाळला ‘ब्लॅक डे’

Federation of western india cine employees called march in film city for Pulwama Attack Protest
Federation of western india cine employees called march in film city for Pulwama Attack Protest

काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना जगभर श्रध्दांजली अर्पण केली जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गोरेगाव चित्रनगरीतील चित्रिकरण बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा सिनेकामगार संघटनेने केली आहे.

दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये संपूर्ण चित्रपटनगरी बंद ठेवण्यात येणार आली. अनेक कलाकार, निर्माते आणि कामगारांनी पुलवामातील भ्याड हल्ल्याचा निषेध केला. या बंदच्या वेळी कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण, पोस्ट प्रोडक्शन तसेच एडिटिंगची कामे करण्यात आली नाहीत.

त्याचप्रमाणे ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्पलॉइज’ (एफडब्लूआयसीई) आज हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत ‘ब्लॅक डे’ पाळला गेला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com