Bigboss Marathi 2 :  'त्या' कॉमेंटवरुन शिवानी आणि वीणामध्ये होणार वाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

बिगबॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातच्या घरातून बाहेर पडलेल्या शिवानी सुर्वेची पुन्हा एंट्री झालेली आहे. नुकत्याच झालेल्या विकेंडच्या 'शो' मध्ये शिवानी बिगबॉसच्या घरात परत आलेली आहे.

बिगबॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातच्या घरातून बाहेर पडलेल्या शिवानी सुर्वेची पुन्हा एंट्री झालेली आहे. नुकत्याच झालेल्या विकेंडच्या 'शो' मध्ये शिवानी बिगबॉसच्या घरात परत आलेली आहे. त्यामुळे शिवानीच्या चाहात्यांना जरी याचा आनंद झाला असला तरी, काहींना मात्र तीचं परत येणं खटकत आहे. घरात परतल्यानंतर शिवानी आणि विणामध्ये एका कॉमेंटवरुन वाद होणार आहेत.

शिवानी आणि पराग दोंघाच्या घरात आल्यापासूनच वादविवाद झाले होते. दरम्यान, एकदा शिवानीबाबत 'आता मी हिला नादी लावतो' असं पराग वीणाला म्हणाला होता. विणानेही त्याबाबत ''हो ती आहेच, तशी'' अशी कॉमेंट शिवानीबाबत केली होती. याच कॉमेंटवरच येत्या भागात शिवानी आणि विणामध्ये वाद होणार आहेत.''तशी म्हणजे कशी आहे?'' असा सवाल शिवानी विणाला विचारणार आहे. त्यावर वीणा शिवानीला काय उत्तर देते हे जाणुन घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

दरम्यान, बिगबॉसच्या घरात आज एक नवीन खेळ होणार आहे.  यामध्ये बॉक्समध्ये काही वस्तू दिल्या आहेत. त्यांचा वस्तू पाहून घरातील व्यक्तींची नावे घ्यायची आहेत. यामध्ये माचिस, खंजिर अशा काही वस्तू आहेत. या वस्तू आणि घरातील सदस्य यांच्यामधील हा खेळ आजच्या भागात  प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight between Shivani and Vina in Bigboss Marathi season 2

टॅग्स