The Kerala Story: जितेंद्र आव्हाडां विरोधात गुन्हा दाखल, द केरळ स्टोरी बद्दलचं 'ते' वक्तव्य भोवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 filed against NCP leader Jitendra Awhad, at Vartak Nagar Police Station in Thane for his statement against the kerala story

The Kerala Story: जितेंद्र आव्हाडां विरोधात गुन्हा दाखल, द केरळ स्टोरी बद्दलचं 'ते' वक्तव्य भोवलं

filed against NCP leader Jitendra Awhad for his statement against The Kerala Story News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

The Kerala Story च्या निर्मात्यासाठी "सार्वजनिकरित्या फाशी देण्यात यावी" असे विधान केल्याबद्दल ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर आयपीसी कलम ५०० अंतर्गत नॉन-कॉग्निझेबल (NC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले, अगदी निर्मात्याला सार्वजनिकरित्या फाशी देण्याची मागणी त्यांनी आली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'द केरळ स्टोरी'च्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे. अधिकृत आकडा जो समोर आला आहे तो 3 असून त्याला 32,000 दाखवण्यात आलं.

या काल्पनिक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला सार्वजनिकरित्या फाशीची दिली पाहीजे, असे आव्हाड म्हणाले होते.

इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाकडून मुलींच्या भरतीचे चित्रण करणाऱ्या सुदिप्तो सेन-दिग्दर्शनाने त्याच्या द केरला स्टोरी सिनेमाने देशभरात मोठे राजकीय वादळ उठवले आहे.

या चित्रपटाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मिळाला असून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी चित्रपट घोषित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या बल्लारी येथील रॅलीत या चित्रपटाचा उल्लेख करताना म्हटले होते की, या चित्रपटाने समाजातील दहशतवादाचे परिणाम उघड केले आहेत. असं म्हणत नरेंद्र मोदींनी द केरळ स्टोरी सिनेमाला पाठिंबा दिलाय.

दरम्यान 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या द केरळ स्टोरीवरुन वेगळ्या प्रकारची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे.

प्रतिक्रिया देण्यात बॉलीवूडचे दिग्गज सेलिब्रेटी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांची संख्या मोठी आहे.