चित्रपट शतकपूर्ती महोत्सव रंगणार कोल्हापुरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

सोमवारी (ता. २) सकाळी दहाला खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभापासून शोभायात्रेला प्रारंभ होईल. त्यात शंभर वर्षातील चित्रपटांवर आधारित चित्ररथ असतील. सायंकाळी चार वाजता शंभर वर्षातील दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाला प्रारंभ होईल.

कोल्हापूर - येथील मराठी चित्रपट व्यावसायिक समितीतर्फे सोमवार (ता. २) पासून चित्रपट शतकपूर्ती महोत्सव रंगणार आहे. सलग तीन दिवस शाहू स्मारक भवनात जुन्या मराठी चित्रपटांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भव्य शोभायात्रेने या महोत्सवाला प्रारंभ होणार असल्याची माहिती ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, अभिनेता आनंद काळे यांनी पत्रकार 
परिषदेत दिली. 

सोमवारी (ता. २) सकाळी दहाला खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभापासून शोभायात्रेला प्रारंभ होईल. त्यात शंभर वर्षातील चित्रपटांवर आधारित चित्ररथ असतील. सायंकाळी चार वाजता शंभर वर्षातील दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाला प्रारंभ होईल. सायंकाळी सहाला चित्रपट व्यावसायिकांचे सत्कार आणि त्यानंतर ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट दाखवला जाईल. मंगळवारी (ता. ३) निखिल साने, सुनिल फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी तीनला चर्चासत्र व सत्कार होतील. त्यानंतर पाचला ‘छत्रपती शिवाजी’ आणि सातला ‘दो ऑखे बारह हाथ’ हे चित्रपट दाखवले जातील. बुधवारी (ता. ४) दुपारी तीनला ‘एक गाव-बारा भानगडी’ हा चित्रपट दाखवला जाईल.

सायंकाळी सहाला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महेश कोठारे, विजय पाटकर, अलका कुबल, राहूल सोलापूरकर, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या उपस्थितीत चर्चासत्र व सत्कार होतील. रात्री नऊला ‘पिंजरा’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल.  चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, सुभाष गुंदेशा, सर्जेराव पाटील, सतीश बिडकर, रणजीत जाधव, अमर मोरे, सदा पाटील, सदाशिव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

चित्रपट निर्मितीला चालना

चित्रमहर्षी आनंदराव पेंटर, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी भारतीय बनावटीचा कॅमेरा स्वतः तयार करून १९१९ मध्ये चित्रपट निर्मिती सुरू केली. पहिला मूकपट ‘सैरंध्री’ हा १९२० मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपट निर्मितीला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने येथील चित्रपट निर्मितीला आणखी चालना मिळावी, हा उद्देश आहे.

राज्य नाट्य स्पर्धेच्या बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा -

नातीगोती मध्ये उलघडले मतीमंद अन् त्यांच्या पालकांचे भावविश्व 

‘तुघलक’ नाटकाचा देखणा प्रयोग 

‘विच्छा माझी पुरी करा’ तून चंदगडची पोरं हुश्शारचा संदेश 

‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ अस्सल ग्रामीण बाजातील नाटक 

‘थिंक पॉईंट’ नाटकात घेतलाय या प्रश्नांचा वेध 

एका फक्कड प्रयोगाची अनुभूती नटरंगने दिली 

राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच यांची दमदार एंट्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film Centenary FestivalI n Kolhapur From Monday