Avinash Das: दिग्दर्शकाला जामीन,अमित शहांचा 'तो' फोटो पोस्ट करणं भोवलेलं Amit Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Filmmaker Avinash Das got bail from the court, posted a picture of Amit Shah with IAS Pooja Singhal

Avinash Das: दिग्दर्शकाला जामीन,अमित शहांचा 'तो' फोटो पोस्ट करणं भोवलेलं

दिग्दर्शक अविनाश दासला(Avinash Das) अहमदाबाद कोर्टानं जामीन(Bail) मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी IAS पूजा सिंघल सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांचा फोटो शेअर करत लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवित संभ्रम निर्माण करण्याचा आरोप अविनाश दासवर करण्यात आला होता. या प्रकरणात अविनाश दासला अहमदाबाद क्राइम ब्रांचनं मुंबईमधनं ताब्यात घेतलं होतं. आता दिग्दर्शकाला कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. यामुळे आता सोशल मीडियावर दिग्दर्शकाच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहे.(Filmmaker Avinash Das got bail from the court, posted a picture of Amit Shah with IAS Pooja Singhal)

हेही वाचा: कसं करणार आलिया-रणबीर बाळाचं वेलकम? अभिनेत्याने पूर्ण लिस्टच वाचून दाखवली

दिग्दर्शक अविनाश दासने जेलमध्ये बंद असलेल्या आईएएस ऑफिसर पूजा सिंघल सोबत अमित शहा यांचा फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे खूपच गोंधळ माजला होता. प्रकरण इतकं पेटलं की अहमदाबाद क्राइम ब्रांचने दिग्दर्शकाविरोधात तक्रार नोंदवली. पूजा सिंघल सध्या तुरुंगात आहे. तिला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.

१४ मे रोजी अविनाश दास विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. दिग्दर्शकाने केंद्रीय मंत्री अमित शहा व्यतिरिक्त भारताच्या तिरंग्याचा ड्रेस परिधान केलेल्या एका महिलेचा आक्षेपार्ह फोटो देखील शेअर केला होता. यानंतर त्याच्यावर आरोप लावला गेला की दिग्दर्शकाने अमित शहासंदर्भात लोकांमध्ये चुकीची समजूत पसरवली आणि राष्ट्रीय धव्जाचा देखील अपमान केला आहे. त्यानंतर अहमदाबाद क्राइम ब्रांचने दिग्दर्शकाला त्यांच्या मुंबईतील घरातून ताब्यात घेतलं होतं.

हेही वाचा: 'Taarak Mehta..' च्या सोनूची आर्थिक तंगी, २००० रुपये वाचवायला बदललं होतं घर

अविनाश दास प्रसिद्ध दिग्दर्शक आहे, ज्यांना त्यांच्या 'अनारकली ऑफ आरा' सिनेमासाठी ओळखलं जातं. या सिनेमात स्वरा भास्कर होती. त्याचबरोबर नेटफ्लिक्सचा 'शी', Zee5 चा 'रात बाकी है', एमएक्स प्लेयरचा 'रनअवे लुगाई' सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.

Web Title: Filmmaker Avinash Das Got Bail From The Court Posted A Picture Of Amit Shah With Ias Pooja

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top