शालिनच्या बायकोचं दुसरं लग्न धुमधडाक्यात!मुलाचा हात धरून Daljeet kaur पोहोचली मंडपात Wedding photos viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daljeet kaur and nikhil patel

शालिनच्या बायकोचं दुसरं लग्न धुमधडाक्यात!मुलाचा हात धरून Daljeet kaur पोहोचली मंडपात Wedding photos viral

मेहेंदी, हळदी आणि संगीतनंतर दलजीत कौरचे निखिल पटेलसोबत लग्न झाले. अनेक महिन्यांपासून अभिनेत्री या क्षणाची वाट पाहत होती. यासाठी ती उत्साहित होती. तसेच ती खूप घाबरलेली देखील होती. तिने आपल्या लग्नाबद्दल इंस्टाग्रामवर आणि अनेक मुलाखतींमध्ये चर्चा केली.

हळदी आणि मेहंदीची सर्व फोटो तिने शेअर केले आहेत. एवढेच नाही तर तिने निखिल पटेलसोबतच्या प्रपोजचा व्हिडिओही तिने पोस्ट केला होता, जेव्हा बिझनेसमनने तिला प्रपोज केलं होतं. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

पांढऱ्या रंगाचा लेहेंगा आणि लाल ओढणीमध्ये अभिनेत्री दलजीत कौर खूपच गोंडस आणि आनंदी दिसत आहे. त्याचबरोबर निखिल पटेलनेही शेरवानी घातली आहे. दोघे खूपच सुंदर दिसत आहे. मुलगा जेडेनही या लग्नाच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आई दिलजीत स्टेजकडे जात असताना जेडेन तिचा हात धरताना दिसत आहे.

दलजीत कौरचे आधी शालीन भानोतशी लग्न झाले होते पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला. आता तिचे लग्न निखिल पटेलसोबत झाले असून त्यांना दोन मुली आहेत. आता ती आपल्या मुलासह आफ्रिकेत शिफ्ट होईल आणि नंतर यूकेमध्ये तिचा संसार स्थायिक करेल.