सोशल हिरोची पहिली जाहिरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

गोविंदा स्टाईलमध्ये डान्स करणारे मध्य प्रदेशचे संजीव श्रीवास्तव म्हणजेच डब्बू अंकल एका लग्न-सोहळ्यातील व्हिडीओमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोशल हिरोच झाले ते. त्यांच्या या डान्सचे बॉलीवूड सेलिब्रिटींनीही कौतुक केले. एवढेच नव्हे; तर खुद्द गोविंदानेही त्यांची स्तुती केली.

एका व्हिडीओमुळे ते संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या डान्समुळे अनेक मोठमोठ्या कंपन्या त्यांना आपल्या जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी बोलावत आहेत. नुकतेच डब्बू अंकल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झाल्याचं सांगितलं आहे. एका इन्श्‍युरन्स कंपनीने त्यांना आपल्या जाहिरातीत काम करण्याची संधी दिली आहे. त्या जाहिरातीतही ते डान्स करताना दिसत आहेत. त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करून लिहिले की, या इन्श्‍युरन्स कंपनीबरोबर काम करायला मजा आली. माझी पहिली जाहिरात... ‘समझो हो गया...’ या गाण्यावर डान्स करायला मजा आली. सगळ्यांना शुभेच्छांसाठी धन्यवाद!’

Web Title: first advertisement of social hero rajiv shrivastav