Nawazuddin Siddiqui: आधी 100 कोटींचा मानहानीचा खटला केला अन् आता नवाजने उचललं 'हे' मोठं पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin

Nawazuddin Siddiqui: आधी 100 कोटींचा मानहानीचा खटला केला अन् आता नवाजने उचललं 'हे' मोठं पाऊल

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या अभिनयाची चर्चा कमी आणि पत्नी आलियासोबत सुरू असलेल्या वादाचीच जास्त आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची विभक्त पत्नी आलिया यांच्यातील वाद हा कायम चर्चेचा भाग असतो. अलीकडेच नवाजने आलिया आणि त्याच्या भावाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र आता नवाजला पत्नी आलियासोबत तडजोड करायची असल्याचे दिसून येत आहे.

खरं तर, 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करताना नवाजुद्दीन सिद्दीकीने आपली विभक्त पत्नी आलिया आणि भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी यांच्यावर समाजात खोटे दावे केल्याचा आरोप केला होता.

पण ताज्या माहितीनुसार, आता नवाजुद्दीन सिद्दीकीने आलियासोबत तडजोड करण्याचे ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवाजच्या वकिलाने आलियाच्या वकिलाला 'सेटलमेंट ड्राफ्ट' पाठवला आहे. सेटलमेंट ड्राफ्ट दरम्यान आलियाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

आज नवाज आणि आलियाला कोर्टात हजर व्हायचे आहे. याआधी न्यायालयानेही या जोडप्याला एकमेकांशी बोलून प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला होता. आता असे मानले जात आहे की आलिया आणि नवाज मुंबई उच्च न्यायालयाला सांगतील की ते आपल्या मुलांच्या भल्यासाठी सर्व काही ठीक करण्यासाठी तयार आहेत.