TARLA DALAL: पुण्याची लेक जिने भारतीय पाककलेला ग्लोबल केलं

सोनी टीव्हीवर तरला दलाल यांच्या ‘कुक इट अप विथ तरला दलाल’ या कार्यक्रमाने त्यांना घराघरात पोहोचवले.
Know about first female Indian Chef  Tarla Dalal
Know about first female Indian Chef Tarla Dalalesakal

कुठल्याही खाद्य पदार्थाचं नाव निघालं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटणं सहाजिकच असतं.(Indian Food)त्याचप्रमाणे कुठलीही न येणारी पाककृती करायची झाल्यास आठवायच्या त्या तरला दलाल.तरला दलाल या भारतीय शेफ होत्या.टीव्ही अस्तित्वात नसतानाचा तो काळ होता.त्या काळातही त्यांचं नाव पाककृतीसाठी अनेकांना तोंडपाठ असावं ही फार मोठी कौतुकाची गोष्ट होती.

तरला दलाल यांचं माहेर म्हणजे पुणे. त्यांचं अख्ख बालपण पुण्यात गेलं. इथल्याच फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी १९५७ साली अर्थशास्त्राची पदवी पूर्ण केली. पुढे लग्नानंतर त्या सासरी म्हणजेच मुंबईला गेल्या. १९६६ साली त्यांनी आपल्या राहत्या घरातून कुकिंग क्लासेसची सुरुवात केली होती.कमी वेळातच त्यांच्या कुकिंग क्लासचे नाव लोकप्रिय झाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. पुढे टीव्ही आल्यानंतर सोनी टीव्हीवरच्या त्यांच्या ‘कुक इट अप विथ तरला दलाल’ या कार्यक्रमाने त्यांना घराघरात पोहोचवले.

कमीतकमी तेल वापरून केलेल्या पाककृती, पारंपरिक खाद्यपदार्थाबरोबरच सहज मिळतील अशा पदार्थापासून विविध देशी-विदेशी पाककृती बनवण्यासाठी तरला दलाल ओळखल्या जात होत्या.(Indian cuisine)जवळपास १७ हजार पाककृती त्यांनी बनवल्या होत्या.त्यांच्या या कार्यासाठी त्यांना २००७ साली ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.(gujrati cuisine)तरला दलाल यांनी बऱ्याच पाककृती आणि पौष्टिक स्वयंपाकाबद्दल लिहिले असले तरी त्यांना भारतीय खाद्यपदार्थांत जास्त रूची होती.तसेच त्यांना गुजराती पाककृतींची विशेष ओढ होती.

Know about first female Indian Chef  Tarla Dalal
Weird Food Trend: चॉकलेट समोसा पाव; तुम्ही कराल का ट्राय?

तरला दलाल या उत्तम लेखिकासुद्धा होत्या.त्यांनी पाककृतींवर अनेक लेख लिहिले आहेत.त्या कुकिंग शोच्या होस्टदेखील होत्या.त्यांचे पहिले पाककृतींचे पुस्तक,'द प्लेझर्स ऑफ व्हेजिटेरियन कुकिंग' १९७४ मध्ये प्रकाशित झाले होते.त्यानंतर त्यांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित झालीत.आणि त्यांच्या करोडो प्रती बाजारात विकल्या गेल्या.त्यांनी सर्वात मोठी भारतीय फूड वेबसाइट देखील चालविली.त्यांनी स्वयंपाकासंबंधीचे बरेच मासिक आणि द्विमासिक प्रकाशित केले.त्यांना २००५ मध्ये इंडियन मर्चंट्स चेंबरतर्फे 'वुमन ऑफ द इयरचा' पुरस्कारही मिळाला.टीव्हीसारखे प्रसार माध्यम नसतानादेखील जगभऱ्यात पाककृतीमधे प्रसिद्धी मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.

Know about first female Indian Chef  Tarla Dalal
Food : नाचणी चॉकलेट कुकीज

तरला दलाल यांचा जन्म पुण्यात झालाय.पुण्याच्या या लेकीने पुण्याचे नाव देश विदेशात गाजवले आहे.त्याचा पुणेकरांना अभिमान आहेच.आता त्यांचा जीवनप्रवास बॉलीवूड अभिनेत्री हूमा कुरेशी हीच्या रुपात बघायला मिळणार आहे.हुमानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाविषयी घोषणा केली आहे.तिचा हा सिनेमा प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ तरला दलाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे.सरला पुणेकर असल्यामुळे पुणेकर हा चित्रपट बघण्यास फार उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com