साधाभोळा आयुषमान बघितला का?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

आपल्या कामाशी एकनिष्ठ असलेल्या आयुष्मानने या चित्रपटाचे चित्रीकरण चक्क बावीस दिवसांत संपवले. या चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे.

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या चलती आहे ती अभिनेता आयुषमान खुरानाच्या चित्रपटांची. याचं कारणही अगदी तसंच आहे. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देण्यात तो यशस्वी ठरला आणि आता त्याच्या हाती अनेक बिग बजेट हिंदी चित्रपट आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे "गुलाबो सिताबो.'

या लूकमधील आयुष्मानचा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाचा साधा भोळा लूक विशेष लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात आयुषमान पहिल्यांदाच बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रीन शेअर करणार आहे. शुजीत सरकार दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात दाखल होईल.

Image result for gulabo sitabo
आपल्या कामाशी एकनिष्ठ असलेल्या आयुष्मानने या चित्रपटाचे चित्रीकरण चक्क बावीस दिवसांत संपवले. या चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first look of Ayushman Khurana in gulabo sitabo released