‘बत्ती गुल’चा फर्स्ट लूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

श्री नारायण सिंह यांचा चित्रपट ‘बत्ती गुल मीटर चालू’चे चित्रीकरण मोठ्या जोरात सुरू होते. सगळ्यांचा उत्साह पाहून या चित्रपटाचे चित्रीकरण वेळेआधीच संपेल असे वाटत होते. पण मधेच या चित्रपटाचे चित्रीकरण थांबले आणि चित्रपट आणखी लांबणीवर गेला. पण नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू झाले आहे. शाहिदनेही कोणतीही कुरकुर न करता चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. शाहिद लवकरच पुन्हा एकदा बाबा होणार आहे. पण आपल्या पत्नीबरोबर सुट्टीवर न जाता त्याने चित्रीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर शाहिदने आपल्या चित्रीकरणावेळचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये शाहिद आणि श्रद्धा कपूर दोघेही खूप क्‍यूट दिसत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तराखंडमधील तेहरी येथे करण्यात येत आहे. ही गोष्ट एका वकिलाची आहे; जो या गावातील वीजबिलाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first look of batti gul movie