Gangubai Kathiawadi : घायाळ! 'गंगुबाई'च्या रूपातली आलिया बघाच!

टीम ईसकाळ
बुधवार, 15 जानेवारी 2020

वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारी आलिया आता पुन्हा काय हटके घेऊन येते याची प्रतिक्षा नेहमीच तिच्या चाहत्यांना असते. तिने या अपेक्षांची पूर्ती करत आज 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलंय. या चित्रपटाची पहिली झलक लवकरात लवकर यावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. आज गंगुबाईचे हे पोस्टर शेअर केल्यावर आलिया पुन्हा आपल्या अभिनयाची जादू दाखविण्यासाठी सज्ज आहे. संजय लीला भन्साळींची निर्मिती असलेला हा चित्रपट आणि आलिया पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करेल हे आजच सिद्ध झाले आहे.

अजय देवगणने मानले योगी आदित्यनाथ यांचे आभार!

मुंबईतील संवेदशील अशा कामाठीपुरामधील गंगुबाईच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल. गंगुबाईंना 'मॅडम ऑफ कामाठीपुरा' म्हणून ओळखले जायचे. लहान वयातच वेश्याव्यवसायाच्या खाईत लोटलेल्या गंगुबाईची गोष्ट हा चित्रपट सांगेल. कामाठीपुऱ्यात आल्यानंतर गंगुबाईंना प्रचंड संघर्ष करावा लागला. तिथल्या कुख्यात गुंडांशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या मदतीने त्या परिसरात काम करू लागल्या. महिलांना आर्थिक मदत आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणारी महिला अशी गंगुबाईंची ओळख होती. त्यांना माफिया क्वीन असेही संबोधले जायचे. याच सर्व कथानकाभेवती 'गंगुबाई'ची गोष्ट सांगण्यात आली आहे. आलिया गंगुबाईंची भूमिका करेल.

फरहानच्या दुसऱ्या लग्नावर वडिल जावेद अख्तर म्हणाले...

आलियाने शेअर केलेल्या एका फोटोत ती ब्लाऊज आणि परकरमध्ये एका भिंतीला टेकून बसलीये. दोन वेण्या, मोठं कुंकू आणि निशःब्द नजर असलेली आलिया रोखून आपल्याकडे बघतीय असं वाटेल. तिच्या शेजारच्या टेबपलावर एक बंदूकही दिसतीये. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये गंगुबाईचा ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो दाखविण्यात आला आहे. मोठं कुंकू, नाकात छोटीशी नथ आणि करारी नजर असलेली गंगुबाई तुम्हाला काहीतरी सांगू पाहतीय असं हे पोस्टर बघितल्यावर वाटेल.    

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चित्रपटाच्या पोस्टरवरूनच आलिया धुमाकूळ घालणार असं दिसतंय. ती पहिल्यांदाच इतक्या वेगळ्या धाटणीची भूमिका साकारत आहे. लेखक हुसैन जैदी यांच्या 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावरून या चित्रपटाची कथा घेण्यात आली आहे. आलिया आधी प्रियांकाला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. आलियासोबत कोणता कलाकार या चित्रपटात हे स्पष्ट झालेले नाही. 'गंगुबाई काठीयावाडी' हा चित्रपट 11 सप्टेंबरला रिलीज होईल.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First look of Gangubai Kathiawadi released today