साऊथमध्ये जन्मला आणखी एक 'रजनीकांत'; दुधानं, दारुनं अभिषेक 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

दक्षिणेकडील प्रसिध्द अभिनेता विजय देवरकोंडा याच्या ‘लाइगरः साला क्रॉसब्रीड’ नावाच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

मुंबई - दाक्षिणात्य सिनेमांमध्ये रजनीकांत या अभिनेत्याची काय क्रेझ आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अशीच लोकप्रियता आणखी एका अभिनेत्याच्या वाट्याला आली आहे. त्याच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिध्द झाले आहे. त्यानंतर लाखोच्या संख्येने त्याला हिटस मिळण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे त्याच्या फोटोला काही ठिकाणी दुध तर काही ठिकाणी दारुनं अभिषेक त्याच्या चाहत्यांनी घातली आहे.

दक्षिणेकडील प्रसिध्द अभिनेता विजय देवरकोंडा याच्या ‘लाइगरः साला क्रॉसब्रीड’ नावाच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. लायगर म्हणजे असा वाघ की जो मिक्स ब्रीड आहे. जे नर सिंह आणि मादी वाघीण यांच्यातील संबंधातून होतो. या चित्रपटाचे जे पोस्टर रिलिज झाले आहे त्यात विजय हा आक्रमक स्वरुपात दाखविण्यात आला आहे. त्यानं बॉक्सिंग ग्लोव्हज घातले आहेत. त्याच्या मागे अर्धा सिंह आणि अर्धा वाघ यांचे चित्र दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. तर प्रॉडक्शन करण जोहरचं आहे. रविवारी करण जोहरनं यासंबंधीची एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली होती. त्यावेळी त्यानं चाहत्यांना या नव्या चित्रपटाची माहिती दिली होती. त्यानं असे सांगितले की, या चित्रपटात अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांची प्रमुख भूमिका आहे.

साऊथच्या प्रेक्षकांनी विजयच्या या नव्या सिनेमाचे हटके स्वागत केले आहे. अशा प्रकारचे स्वागत केवळ रजनीच्या सिनेमाचे व्हायचे ते आता विजयच्या सिनेमाचेही झाले आहे. विजयच्या नव्या चित्रपटाचे स्वागत करताना चाहत्यांनी फटाके फोडले, काहींनी केक कापला, काहींनी या विजयच्या या सिनेमाच्या नावाचा टॅटू काढला. हे कमी की काय म्हणून काही कट्टर चाहत्यांनी ‘लायगर’च्या पोस्टरला दुधाचा अभिषेक करण्यात आला काही ठिकाणी चक्क दारूने आंघोळ घातल्याचे दिसून आले.विजय देवरकोंडा हा टॉलिवूडचा मेगास्टार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये केवळ रजनीकांतच नव्हे तर मास्टर विजय, विजय सेतूपती, अजित कुमार या अभिनेत्यांच्या येणा-या चित्रपटांना देखील अशाच प्रकारचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम, टॅक्सीवाला सारखे अनेक सुपरहिट सिनेमे त्याने दिले आहेत.  यापूर्वी प्रदर्शित झालेला ‘वर्ल्ड फेमस लवर’ हा त्याचा सिनेमा फार चालला नाही. या सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. त्यात विजयच्या जोडीला अनन्या पांडे दिसणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first look of poster Vijay deverakonda fans pour milk and alcohol on poster