'सिंबा'चा फर्स्ट लूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

रणवीर सिंग या चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

रोहित शेट्टी आणि करण जोहर यांची निर्मिती असलेल्या ‘सिंबा’ या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. केदारनाथ चित्रपटानंतर हा साराचा दुसराच चित्रपट आहे. रणवीर सिंग या चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

simba

रोहित शेट्टी, पोलिसाची भूमिका हे काही नवीन कॉम्बिनेशन नाही; मात्र रणवीर आणि पोलिस हे कॉम्बिनेशन नवीन आहे. या चित्रपटातील रणवीर आणि साराचा लूक रोहित शेट्टी आणि धर्मा प्रॉडक्‍शनच्या अकाऊंटवरून करण जोहरने पहिल्यांदाच प्रसिद्ध केला आहे. या लूकबरोबर त्यांनी त्यांचा व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित शेट्टी आणि करण जोहरही आहे. साराचा लूक या चित्रपटात एक बबली गर्लसारखा आहे, तर रणवीर एका टिपिकल पोलिसी अवतारात आहे; पण युनिफॉर्म काही त्याच्या अंगावर नाहीय.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first look of simba