'दिस येती...' - न्युडचे पहिले गाणे रिलीज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

'दिस येती...' हे न्युडचे पहिले गाणे नुकताच रिलीज झाले आहे. 

बहुचर्चित सिनेमा 'न्युड' याचे नुकतेच पहिले गाणे रिलीज झाले आहे. 'दिस येती...' असे गाण्याचे बोल आहेत. सायली खरे हिने हे गाणे गायले आहे. सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. रवी जाधव यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.  

हा सिनेमाचे कथानक चित्रकला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पोझ देणाऱया मॉडेल्सच्या जीवनाभोवती फिरते. अभिनेते नसिरुद्दीन शाह हे यांची देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. 27 एप्रिलला 'न्युड' प्रदर्शित होणार आहे. 

न्युडला न्युयॉर्क इंडीयन फिल्म फेस्टिवलच्या ओपनिंग सिनेमाचा बहुमान मिळाला होता. तर अभिनेत्री विद्या बालन यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ज्युरी टिम कडून सिनेमाला स्टँडींग ओवेशन मिळाले होते. अभिनेत्री कल्याणी मुळे ही सिनेमात मुख्य भुमिका साकारणार आहे. सिनेमातील 'दिस येती...' या पहिल्यावहिल्या गाण्यात मुख्य पात्राच्या आयुष्यात सामान्य बाई ते न्युड मॉडेल असा प्रवास थोडक्यात दाखवला आहे. या गाण्यात गावाकडचा परिसर दाखवण्यात आला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: First Song Release of Nude Marathi Movie