Flashback 2019 : मध्ये हे या 10 चित्रपटांचं निघालं दिवाळं

वृत्तसंस्था
Tuesday, 24 December 2019

Flashback 2019 : हे वर्षं आता संपत आलंय. डिसेंबर महिना सुरू होताच वर्षातील चांगल्या-वाईट गोष्टींचा आढावा घेतला जातो. काही चित्रपटांना काही हे वर्ष मानवलं नाही. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवला, तर काही चित्रपटांना बजेटपुरते पैसे कमावण्याचीही संधी नाही मिळाली.

फ्लॅशबॅक 2019 : 2019 वर्षं आता संपत आलंय. डिसेंबर महिना सुरू होताच वर्षातील चांगल्या-वाईट गोष्टींचा आढावा घेतला जातो. चित्रपटसृष्टीबाबत बोलायचे झाल्यास अनेक चांगले चित्रपट या वर्षाने आपल्याला दिले. तर काही चित्रपटांना काही हे वर्ष मानवलं नाही. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवला, तर काही चित्रपटांना बजेटपुरते पैसे कमावण्याचीही संधी नाही मिळाली. यात काही बिग बॅनर चित्रपट होते, जे चांगलेच आपटले. तर काही असेही चित्रपट होते, ज्यांच्यामागे मोठे प्रॉडक्शन हाऊस नसूनही त्यांनी चांगली कमाई केली. त्यापैकीच हे 10 चित्रपट ज्यांना 2019 मानवलं नाही...

Image may contain: 6 people, text

1. कलंक -
माधुरी दिक्षीत, संजय दत्त, अलिया भट, वरूण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला, धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या 'कलंक' या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, काही कारणाने कलंक त्या पूर्ण करू शकला नाही. भव्यदिव्य सेट्स, उंची वस्त्रं, श्रीमंत लूक असलेल्या चित्रपटाचे बजेट 150 कोटी होते. पण, तो तितके कमवू शकला नाही. 

Image may contain: 2 people, people smiling, text

2. सांड की आँख -
तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'सांड की आँख' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जादू करू शकला नाही. भारतातील सर्वात वृद्ध महिला शार्पशूटर्सच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. टीकाकारांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटांत अनावश्यक सीनचा जास्त वापर केल्याने हा चित्रपट पडला. या चित्रपटाला अनुराग कश्यपची निर्मिती होती. 

Image may contain: 3 people, people smiling, text

3. स्टुडंट ऑफ द ईयर : 2 -
करण जोहरच्या पहिल्या स्टुडंट ऑफ द ईयरने तरूणाईला वेड लावले होते. मात्र, तितकी जादू दुसरा स्टुडंट ऑफ द ईयर करू शकला नाही. यातील स्टारकास्ट नवी होती, चेहरे नवे होते, गोष्ट नवी होती. तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही. या चित्रपटात टायगर श्रॉफ, तारा सुतारिया व अनन्या पांडे हे कलाकार होते. 

Image may contain: 1 person, text

4. केसरी -
खिलाडी कुमार अक्षय कुमार अभिनीत चित्रपट केसरीने अपेक्षित कमाई केली नाही. सारागढीच्या लढाईवर असलेला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र तो पूर्ण करू शकला नाही. 21 पंजाबी सैनिक आणि 1500 अफ्रीदी ऑरॅकझाईंमध्ये ही लढाई झाली होती. या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट होता. करण जोहर निर्मित हा केसरी अनुराग सिंगने दिग्दर्शित केला होता. 

Image may contain: 6 people, people smiling, text

5. द स्काय इज पिंक -
बऱ्याच दिवसांनंतर देसी गर्ल प्रियांका चोप्राने 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले. यात फरहान अख्तर, जायरा वसीम अशी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर तितकी कमाई केली नाही. याही चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडला नाही.

Image may contain: one or more people, cloud and text

6. जंगली -
विद्युत जामवालची मुख्य भूमिका असलेला जंगली हा चित्रपट गाजेल असे वाटले होते, मात्र तो तितका जादू करू शकला नाही. हत्तींची शिकार करण्यापासून हा नायक शिकाऱ्यांना कसा रोखतो अशा आशयाचा असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये चालला नाही, मात्र, नंतर टेलिव्हिजनवर या चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली. यात मराठी अभिनेत्री पूजा सावंत हिची महत्त्वाची भूमिका आहे. 

Image may contain: 2 people, text

7. मरजावां -
रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांच्या मुख्य भूमिका असलेला मरजावां चित्रपटाची आधी खूप चर्चा झाली. मात्र रिलीज झाल्यानंतर तो तितका चालला नाही. या रितेश देशमुखने एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारली आहे. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing, text and outdoor

8. द झोया फॅक्टर -
अभिषेक शर्मा दिग्दर्शित 'द झोया फॅक्टर' हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज झाला. याच्या ट्रेलवरून तरी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पण रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला नाही. सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तिने 'लकी झोया'ची भूमिका साकारली होती.

Image may contain: 3 people, people smiling, text

9. दे दे प्यार दे -
अजय देवगण, तब्बू आणि रकूल प्रीत सिंग असे उत्तम कलाकार असलेला 'दे दे प्यार दे' या चित्रपटालाही 2019 फारसं मानवलं नाही. कलाकारांवरून तरा हा चित्रपट चालेल अशी आशा होती, मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाला उचलून धरले नाही. अकीव अली हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. 

Image may contain: 1 person

10. साहो -
बाहुबली फेम प्रभास हा 'साहो' चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. प्रभास हा या चित्रपटात असल्याने सर्वांना साहोची उत्सुकता लागली होती. त्याच्या ट्रेलरवरूनही हा चित्रपट चांगला चालेल असा अंदाज होता. तसेच श्रद्धा कपूरही या चित्रपटात असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण बॉक्स ऑफिसवर व प्रेक्षकांच्या मनावर या चित्रपटाने जादू केली नाही. सुजीथ हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flop movies of the year 2019