हाॅट बेब फ्लोरा सैनीचे मराठीत आगमन

टीम ई सकाळ
शनिवार, 27 मे 2017

फ्लोरा हे नाव हिंदी व दक्षिणेतील सिनेसृष्टीला नवे नाही. तिने 50 हून अधिक सिनेमात कामे केली आहेत. बेगम जान या नुकत्याच येऊन गेलेल्या सिनेमातही तिने काम केले होते. 

मुंबई: मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड निर्माते व दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. मराठी प्रेक्षक वेगळ्या विषयांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो. ही बाब लक्षात घेऊन योगायतन फिल्मस् ने वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा परी हूँ मैं हा हटके मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी आणला आहे.

रोहित शिलवंत दिग्दर्शित परी हूँ मैं या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाचा वेगळा विषय प्रत्येकाला नक्कीच भावेल असा विश्वास निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केला.

फ्लोरा हे नाव हिंदी व दक्षिणेतील सिनेसृष्टीला नवे नाही. तिने 50 हून अधिक सिनेमात कामे केली आहेत. बेगम जान या नुकत्याच येऊन गेलेल्या सिनेमातही तिने काम केले होते. 

चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची आहे. चित्रपटाचे छायांकन रोहन मडकईकर करणार असून संकलन ह्रीतेकेश मामदापूर यांचे असणार आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत सांभाळणार आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर कुणाल मेहता आहेत.

संगीत समीर साप्तीस्कर यांचे आहे. सहनिर्माता संजय गुजर असून कार्यकारी निर्माते भाविक पटेल आहेत. प्रोजेक्ट हेड भूषण सावळे आहेत.

Web Title: flora saini In marathi entertainment esakal news