भारतीय चित्रपटांचे परदेशी चाहते 

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

दीपिका पदुकोणनेही ऐश्‍वर्याच्या पावलावर पाऊल ठेवत कान्सच्या रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली. कान्समध्ये सामील झाल्यानंतर आपल्या भारतीय प्रेक्षकांशी व्हिडीओद्वारे दीपिकाने संवाद साधला.

दीपिका पदुकोणनेही ऐश्‍वर्याच्या पावलावर पाऊल ठेवत कान्सच्या रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली. कान्समध्ये सामील झाल्यानंतर आपल्या भारतीय प्रेक्षकांशी व्हिडीओद्वारे दीपिकाने संवाद साधला.

या व्हिडीओमध्ये तिने भारतीय चित्रपट सातासमुद्रापार पोहोचला आहे आणि परदेशी प्रेक्षकांना भारताच्या चित्रपटातील सांस्कृतिक प्रतिबिंब आजही प्रभावित करते, असे सांगितले. ती पुढे म्हणाली, "मला असे वाटते की, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांची संस्कृती, नृत्य, गाणी यातील भव्यता अशी ओळख आहे. त्यांना आजही भारतीय चित्रपटांतील ही बाब आवडते. भारतीय चित्रपटांचा खूप मोठा चाहता वर्ग इथे आहे. भारतीय चित्रपटांनाही त्यांना देण्यासाठी खूप काही आहे. वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या संस्कृती देखील.' 

Web Title: Foreign fans of Indian films