Pankaj Udhas Birthday: म्हणून.. 'चिठ्ठी आयी है' फेम पंकज उदास आजही विलासराव देशमुखांचे ऋणी आहेत.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

former maharashtra cm vilasrao deshmukh suggest pankaj udhas name for padma shri award

Pankaj Udhas Birthday: म्हणून.. 'चिठ्ठी आयी है' फेम पंकज उदास आजही विलासराव देशमुखांचे ऋणी आहेत..

Pankaj Udhas Birthday: आजही ज्यांच्या आवाजाने रसिकांचे डोळे पाणावतात,त्यांच्या गझल मधले शब्द आपल्याला आपलं आयुष्य वाटू लागतात. असे ज्येष्ठ गायक पंकज उदास यांचा आज वाढदिवस.

आज ते आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंकज उदास आज इतके दिग्गज असले तरी ते आजही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे ऋणी आहेत. अर्थात त्याचे कारणही तसेच आहे. तोच किस्सा आज त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने पाहूया..

(former maharashtra cm Vilasrao Deshmukh suggest pankaj udhas name for padma shri award )

'चिट्ठी आए नं संदेश','न कजरे की धार','आदमी खिलौना है','चांदी जैसा रंग है तेरा' अशा कितीतरी पंकज उदास यांच्या गाण्यांनी चाहत्यांचं मन जिंकलं होतं. आजही ही गाणी मनात घर करुन आहेत.

पंकज उदास यांच्या याच गायन क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी २००६ मध्ये पंकज उदास यांना तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांच्या हस्ते चौथा सर्वोच्च नागरिक सम्मान पद्मश्री(Padmashree) पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

पण किस्सा असा आहे की, हा पुरस्कार जाहीर झाला तरी पंकज उदास यांना त्याची कल्पना नव्हती.. मग जा पुरस्कार मिळाला कसा? तर त्यामागेही एक रंजक गोष्ट आहे.

पंकज उदास यांची गाणी विलासराव देशमुख यांना खूप आवडायची. एकदा या दोघांची एका समारंभात भेट झाली. या कार्यक्रमात पंकज उदास यांनी काही गाणी सादर केली आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांना पंकज उदास स्टेजच्या मागील बाजूस असलेल्या ग्रीन रुममध्ये भेटले.

या भेटीदरम्यान त्यांच्यात छान गप्पाही रंगल्या. तेव्हा त्याक्षणी विलासराव देशमुख यांनी पंकज उदास यांना सांगितलं होतं की,ते पंकज उदास यांच्या गाण्यांचे चाहते आहेत. आणि विलासरावांनी विचारलं.. '' पंकजजी तुम्हाला पद्मश्री मिळाला आहे का?''

मात्र पंकज उदास यांनी विलासरावांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं . त्यांना काहीच अर्थ लागला नाही. त्यानंतर काही दिवसांनी पंकज उदास यांना आपल्या करिअरची २५ वर्ष पूर्ण केल्याने आणि ते कॅन्सर पीडितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना सहकार्य करत असल्याने २००६ साली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री जाहिर करण्यात आला.

विशेष म्हणजे याविषयी पंकज उदास यांना काहीच माहित नव्हते. त्यांच्या एका मित्राने जेव्हा अभिनंदनासाठी फोन केला तेव्हा पंकज उदास आधी हैराण होऊन म्हणाले,''कशासाठी अभिनंदन?'' तेव्हा मित्रानं त्यांना पद्मश्री घोषित झाल्याचं सांगितलं होतं.

ही बातमी ऐकून आपल्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. आणि त्यावेळी पंकज उदास यांना  विलासराव देशमुख यांच्या प्रश्नाचा अर्थ लागला. 'केवळ विलासराव होते आणि त्यांनी कामाची दखल घेतली म्हणून पद्मश्री मिळाला' असे पंकजजी आजही सांगतात.