साजिदचा "फॉक्‍स स्टार'शी करार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

साजिदचा "फॉक्‍स स्टार'शी करार "फॉक्‍स स्टार स्टुडिओज'ने निर्माता साजिद नाडियादवालाशी एक करार केला आहे. त्यानुसार हे दोन्ही प्रॉडक्‍शन हाऊस तीन चित्रपटांची निर्मिती करतील. त्यात अभिनेता वरुण धवनच्या "जुडवा 2' या चित्रपटाचा समावेश आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर "बागी' चित्रपटाचा सिक्वेलही बनवण्यात येणार आहे. त्यात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असेल. तिसऱ्या चित्रपटाद्वारे सुनील शेट्टीचा मुलगा अहान याचे लॉन्चिंग केले जाणार आहे. याबाबत साजिद म्हणाला, "फॉक्‍स स्टार स्टुडिओ' दोन वर्षांपासून चांगले आशय असलेल्या चित्रपटांची निर्मिती करत आहे.

साजिदचा "फॉक्‍स स्टार'शी करार "फॉक्‍स स्टार स्टुडिओज'ने निर्माता साजिद नाडियादवालाशी एक करार केला आहे. त्यानुसार हे दोन्ही प्रॉडक्‍शन हाऊस तीन चित्रपटांची निर्मिती करतील. त्यात अभिनेता वरुण धवनच्या "जुडवा 2' या चित्रपटाचा समावेश आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर "बागी' चित्रपटाचा सिक्वेलही बनवण्यात येणार आहे. त्यात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असेल. तिसऱ्या चित्रपटाद्वारे सुनील शेट्टीचा मुलगा अहान याचे लॉन्चिंग केले जाणार आहे. याबाबत साजिद म्हणाला, "फॉक्‍स स्टार स्टुडिओ' दोन वर्षांपासून चांगले आशय असलेल्या चित्रपटांची निर्मिती करत आहे. त्यांच्यासोबतच्या भागीदारीबाबत मी खूपच उत्सुक आहे.'  

Web Title: Fox Star Studios, Sajid Nadiadwala sign a three-film deal