Fraud Case:'सिनेमाच्या शूटिंगसाठी गेला अन्..', नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य विरोधात लखनौमध्ये FIR दाखल

31ऑक्टोबर,2022 रोजी गोमती नगरच्या पोलिस ठाण्यात लखनौ येथील मधुसूदन राव नामक व्यक्तीनं गणेश आचार्य विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Fraud Case: Fir Against Choreographer Ganesh Acharyaa
Fraud Case: Fir Against Choreographer Ganesh AcharyaaGoogle

Fraud Case: बॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यच्या विरोधात लखनौ येथील गोमती नगर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि लबाडी केल्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी गोमती नगरच्या पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली एफआयआर अगोदर 'देहाती डिस्को' नावाच्या सिनेमाचा निर्माता कमल किशोर विरोधात केली होती.

गुन्हा दाखल करणाऱ्या पीडीत व्यकतीनं खरंतर कमल किशोर सोबत गणेश आचार्यचे नाव देखील घेतले होते पण पोलिसांनी गणेश आचार्यचे नाव एफआयआर मध्ये लिहिले नव्हते. पण आता पोलिसांनी गणेश आचार्यचे नाव देखील एफआयआर मध्ये लिहिल्यानं केसला वेगळं वळण मिळालं आहे.(Fraud Case: Fir Against Choreographer Ganesh Acharyaa)

Fraud Case: Fir Against Choreographer Ganesh Acharyaa
2022 IMDb Ranking: बॉलीवूड पडले मागे, टॉलीवूडच्या कलाकारांची बाजी...

३० ऑक्टोबरला मानक नगरमध्ये राहणाऱ्या मधुसूदन राव याने गोमती नगर पोलिस ठाण्यात सिने-निर्माता कमल किशोर विरोधात फसवणूक,लबाडी आणि धमकवण्याचा गुन्हा दाखल केला होता. पीडित व्यक्तीचा आरोप होता की त्याने 'देहाती डिस्को' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान कॅटरिंगचं पूर्ण काम सांभाळलं होतं. या दरम्यान त्याचे ७.३७ लाख रुपये खर्च झाले,पण निर्माता कमल किशोरनं एक रुपयाही त्याला दिला नाही, पीडित व्यक्तीनं हा देखील आरोप केला होता की पैसे मागितल्यावर निर्मात्यानं त्याला धमकी देखील दिली होती.

एडीसीपी पूर्वी अली अब्बास यांनी या केस संदर्भात सांगितलं की पीडित व्यक्ती मधुसूदन राव याने आपल्या तक्रारीत असा आरोप केला होता की त्याला कॅटरिंगचे काम गणेश आचार्यने मिळवून दिले होते. पण काम पूर्ण झाल्यावर जेव्हा पेमेंट करण्याची वेळ आली तेव्हा गणेश आचार्यने त्यातून अंग काढून घेतलं. आणि त्यानंतर गणेश आचार्य आणि सिनेनिर्माता कमल किशोर यांनी त्यांचे मोबाईल फोनही बंद केले होते. पीडित व्यक्तीनं तक्रारीत म्हटलं होतं की गणेश आचार्य आणि कमल किशोर यांनी मिळून त्याला लुबाडलं आहे,त्याचे पैसे लुटले आहेत.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

एडीसीपीनं पुढं सांगितलं की पीडित व्यक्तीनं तक्रारीत कमल किशोरचं नाव नमूद केलं पण चुकून त्याच्याकडून गणेश आचार्यचे नाव राहून गेले. ५ नोव्हेंबरला गणेश आचार्यचे नाव पीडित व्यक्तीनं तक्रारीत दाखल केले. आता त्यासंदर्भातही चौकशी केली जाईल असं एडीसीपी ने सांगितलं.

Fraud Case: Fir Against Choreographer Ganesh Acharyaa
Hemant Dhome:'तेच खुळ्यागत सगळं सुरू आहे ,यातच आलं सग्गळं',लग्नाच्या वाढदिवशी हेमंतची पोस्ट चर्चेत

एडीसीपी पूर्वी यांनी सांगितलं की 'देहाती डिस्को' नावाच्या सिनेमाचा निर्माता कमल किशोर विरोधात गोमती नगर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि लबाडीसंदर्भात पाच तक्रारी आतापर्यंत दाखल केल्या गेल्या आहेत. गुरुवारी ७ डिसेंबर रोजी लखनौहून पोलिसांची एक टीम कमल किशोरचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com