दोन दिवस नेटफ्लिक्स फ्री पाहता येणार,पण त्यासाठी ...

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 21 November 2020

कंपनीला भारतातला एक नवा ग्राहक आपल्याकडे वळवायचा आहे. त्यासाठी त्यांनी नवनवीन ट्रीक शोधायला सुरुवात केली आहे. सध्या नेटफ्लिक्स शिवाय अॅमेझॉन प्राइम वीडियो, डिझ्नी हॉटस्टॉर आणि Zee5, MX Player यासारखे मोठे ऑनलाईन स्ट्रीमर आहेत. त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे.

मुंबई - मनोरंजनासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागणा-या प्रेक्षकांसाठी आता एक आनंदाची बातमी असणार आहे. यात नेटफ्लिक्सने काही खास ऑफर जाहिर केली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आता नेटफ्लिक्स आता येत्या 5 आणि 6 डिसेंबर रोजी  स्ट्रीमफेस्ट (Netflix Stream fest) चे आयोजन करणार आहे. त्याचा फायदा प्रेक्षकांना घेता येणार आहे. तो जास्तीत जास्त दर्शकांनी घ्यावा यासाठी नेटफ्लिक्सकडून आवाहन करण्यात आले आहे.

स्ट्रीमफेस्ट (Netflix Stream fest) च्या माध्यमातून प्रेक्षकांना या माध्यमावर असलेल्या अनेक चित्रपट आणि वेबसीरीज यांचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे यंदा डिसेंबर महिन्यात ही खास ऑफर जाहिर केली जाणार आहे. नेटफ्लिक्स ही अमेरिकन कंपनी 5 आणि 6 डिसेंबर रोजी एका स्ट्रीमफेस्टचे आयोजन करणार आहे.

उपचारासाठी फिजिओथेरपिस्टकडे गेला,तिच्या प्रेमात पडला; गोष्ट प्रभुदेवाची

ज्यांच्याजवळ नेटफ्लिकसचे सबस्क्रिप्शन नाही अशा व्यक्तींना या संधीचा लाभ घेता येणार आहे. थोडक्यात काय तर 5 आणि 6 डिसेंबर या दोन्ही दिवशी प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर असणारा कंटेट अगदी मोफत पाहता येणार आहे.

अमिताभ यांच्याकडे नाहीये एकही ATM कार्ड, स्वतः केला खुलासा

त्याचे काय आहे की. या कंपनीला भारतातला एक नवा ग्राहक आपल्याकडे  वळवायचा आहे. त्यासाठी त्यांनी नवनवीन ट्रीक शोधायला सुरुवात केली आहे. सध्या नेटफ्लिक्स शिवाय अॅमेझॉन प्राइम वीडियो, डिझ्नी हॉटस्टॉर आणि Zee5, MX Player यासारखे मोठे ऑनलाईन स्ट्रीमर आहेत. त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे.

हे ही वाचा: शाहरुखच्या घरात एक रात्र राहण्याची जबरदस्त संधी, इथे करा अर्ज आणि...  

अशा स्पर्धेत टिकायचे झाल्यास काहीना काही जाहिरातीचे फंडे वापरावे लागतात. त्यानुसार कंपनीने ग्राहकांसाठी अशाप्रकारची एक खास ऑफर जाहिर केली आहे. युझर्स वाढविणे आणि ते कायम ठेवण्यासाठी नवीन योजना जाहिर करणे हे या कंपन्यांचे मुख्य काम आहे.

याविषयी अधिक माहिती देताना, भारतातील नेटफ्लिक्सचे कंटेट उपाध्यक्ष मोनिका शेरगिल यांनी सांगितले की, नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आम्हाला आमचा प्रेक्षकवर्ग वाढवायचा आहे. यासाठी अशाप्रकारच्या स्ट्रीमफेस्ट चे आयोजन करण्याचा आम्ही विचार केला आहे. त्याला यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे.

 

प्रेक्षक या सुविधेचा लाभ 5 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून 6 डिसेंबरच्या रात्री 12वाजेपर्यत घेता येणार आहे. जी व्यक्ती नेटफ्लिक्सची सभासद नाही अशी व्यक्तीही यात सहभागी होऊ शकते. त्यासाठी तिने मोबाईलवर आपलं नाव. ईमेल आणि पासवर्ड ने नेटफ्लिक्सवर अकाऊंट ओपन करुन घ्यावे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: free netflix in india without subscription on december 5 and 6