स्वरासाठी फ्रेण्डस म्हणजेच फॅमिली!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

माझ्या आयुष्यात जास्त मित्र नाहीयेत. त्यामुळे हा चित्रपट केल्यानंतर भेटीगाठी करत नवीन मित्र जोडायची गरज आहे, असं मला वाटतं.

- स्वरा भास्कर

करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट "वीरे दी वेडिंग'च्या धमाकेदार, रंगीबेरंगी पोस्टर्सनंतर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला.

veere di wedding

चार मैत्रिणी ज्यांच्यासाठी फ्रेंण्ड्‌स म्हणजेच फॅमिली आहे. नावाप्रमाणेच त्यांच्या लग्नाभोवतीच हा चित्रपट आहे. फ्रेण्डस म्हणजेच फॅमिली याविषयी स्वराला विचारल्यावर स्वरा म्हणाली, "हा चित्रपट करून झाल्यानंतर मला असं वाटतंय की, मी आणखी चांगले मित्र जोडावेत. माझ्या आयुष्यात जास्त मित्र नाहीयेत. त्यामुळे हा चित्रपट केल्यानंतर भेटीगाठी करत नवीन मित्र जोडायची गरज आहे, असं मला वाटतं. या चित्रपटामुळे माझ्या मैत्रिणींबरोबर काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मला आनंदच आहे'.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friends are family for swara bhaskar