Friendship Day : अशी झाली 'फ्रेंडशीप डे'ची सुरवात!

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

'फ्रेंडशिप डे'ची चाहूलच जुलैच्या अखेरीस सुरू होते आणि त्याची तयारीही तितक्याच जोरात सुरू होते. पण तुम्हाला माहितीये का, हा फ्रेंडशिप डे कधी आणि कोणी सुरू केला?

ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे मित्रमंडळींसाठी चंगळ असते... 'फ्रेंडशिप डे'ची चाहूलच जुलैच्या अखेरीस सुरू होते आणि त्याची तयारीही तितक्याच जोरात सुरू होते. पण तुम्हाला माहितीये का, हा फ्रेंडशिप डे कधी आणि कोणी सुरू केला?

Related image

फ्रेंडशिप डे साजरा करायची सुरवात पॅराग्वे या देशाने 1958 मध्ये सुरू केली. एका ग्रीटींग कार्ड तयार करणाऱ्या कंपनीने फ्रेंडशिप डे चा प्रस्ताव ठेवला आणि पॅराग्वे देशात तो सुरू झाला. कालांतराने संयुक्त राष्ट्रांनी जागत शांतता प्रस्थापित होईल या उद्देशाने फ्रेंडशिप डे जगभर साजरा करण्यास सुरवात केली. 2011 मध्ये "फ्रेंडशिप क्रुसेड' या संस्थेने 30 जुलैला फ्रेंडशिप डे साजरा करण्यास सुरवात केली. त्यामुळे काही देशांमध्ये आजच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. ही संस्था विविध देशांमध्ये मैत्री, प्रेम, शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करते. 

2011 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी देशांमध्ये, संस्कृतींमध्ये देवाणघेवाण व्हावी यासाठी फ्रेंडशिप डेला प्रोत्साहन दिले. तसेच तरूणाईचा सहभाग हा सामाजिक कार्यक्रमांमध्ये वाढावा यासाठीही फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. भारतात फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship day starts in 1958