मुरांबा आणि एफयू करणार एकमेकांचे प्रमोशन

टीम ई सकाळ
सोमवार, 29 मे 2017

येत्या शुक्रवारी म्हणजेच 2 जूनला एकमेकांसमोर उभे ठाकणारे हे दोन चित्रपट आता एकत्र एका व्यासपीठावर येणार आहेत. उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी 11 वाजता मुंबईच्या एमसीए येथे या दोन्ही टीम्स एकत्र येणार आहेत आणि एकमेकांचे प्रमोशन करणार आहेत. 

मुंबई : येत्या शुक्रवारी म्हणजेच 2 जूनला एकमेकांसमोर उभे ठाकणारे हे दोन चित्रपट आता एकत्र एका व्यासपीठावर येणार आहेत. उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी 11 वाजता मुंबईच्या एमसीए येथे या दोन्ही टीम्स एकत्र येणार आहेत आणि एकमेकांचे प्रमोशन करणार आहेत. 

सध्या एफयू आणि मुरांबा हेे दोन्ही सिनेमे आपआपले जोरदार प्रमोशन करताना दिसतात. एफयूमध्ये आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, सत्या मांजरेकर, मयुरेश पेम अशी स्टारकास्ट आहे. तर मुरांबामध्ये अमेय वाघ, मिथिला पालकर, सचिन खे़डेकर, महेश मांजरेकर अशी कास्ट आहे. या दोन्ही टीम्स सध्या आपले जोरदार प्रमोशन करताना दिसताहेत. आजवर आपलाच सिनेमा कसा चांगला हे ठासवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. आता मात्र एकमेकांचे प्रमोशन करण्यासाठी या टीम्स एकत्र येणार आहेत.  

एमसीए या ठिकाणी एकत्र आल्यानंतर आपला सिनेमा पाहाच शिवाय, ़दुसरा सिनेमाही कसा चांगला आहे, याची माहिती ते देणार आहेत. 

Web Title: FU and Muramba Togather in Mumbai entertainment esakal news