
Gadar 2 : 'तुम्हाला हे शोभत नाही!' गुरुद्वारात सनी-अमिषाचा बेशिस्तपणा, एकमेकांच्या... कमिटीनं सुनावलं
Gadar 2 Sunny Deol Ameesha Patel in Gurdwara : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेलचा गदर २ हा आता येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मात्र प्रदर्शित होण्यापूर्वी तो एका वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. सनी देओल आणि अमिषा यांना अशा प्रकारचे वागणे शोभते का असा प्रश्न त्या गुरुद्वारा समितीकडून विचारण्यात आला आहे.
काही वर्षांपासून सनीच्या गदर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी चर्चा होती. अखेर तो येतो आहे. चित्रपटातील एक दृष्य हे गुरुद्वारामध्ये चित्रित करण्यात आले होते. मात्र त्यावेळी जे घडलं त्यामुळे गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी) नं नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या कलाकारांनी सभ्यतेच्या पातळ्या ओलांडून गुरुद्वारामध्ये बेशिस्तपणे वर्तन केले आहे.
Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे
एसजीपीसीनं चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याविरोधात तातडीनं कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी केलेल्या वर्तनाचा त्यांच्याकडून खुलासाही मागितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावर आता दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आपली बाजू मांडल्याचे कळते आहे. शर्मा यांनी एका सोशल मीडियावर त्यासंबंधी एक वक्तव्यही केले आहे. त्यात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मागितली माफी....
खरतर सनी देओल आणि अमिषाच्या त्या वागण्यामुळे गुरुद्वाराची समिती ही नाराजी झाली आहे. त्यांनी त्यांच्या वागण्यावर आक्षेपही घेतला आहे. गदर २ मधील एक सीन हा गुरुद्वारामध्ये चित्रित करण्यात आला आहे. त्यात सनी देओल आणि अमिषा पटेल हे एकमेकांच्या मिठीत असल्याचे दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर त्या दृष्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांनी कडाडून टीका केली आहे.
तो सीन चित्रित होत असताना मागे उभे असलेले लोकंही त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आले आहे. एसजीपीसीचे महासचिव गुरचरण सिंह ग्रेवाल यांनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, चित्रपटामध्ये गुरुद्वाराचे अशाप्रकारे चित्रिकरण योग्य नाही. असं कधीही होता कामा नये दोन्ही अभिनेत्यांचे हे बेशिस्त वर्तन आहे. ते खपवून घेतले जाणार नाही.